Coronavirus : पुण्यातून कोरोनाचा होऊ शकतो नायनाट; पण...

Slums are the biggest challenge in controlling corona in Pune.jpg
Slums are the biggest challenge in controlling corona in Pune.jpg

पुणे : दाटवस्ती, आर्थिक परिस्थीती बेताची, अल्प शिक्षण, आरोग्य विषयाचे अज्ञान आणि छोट्या झोपडीत राहणारे आठ ते दहा जणांचे कुटूंब या व अशा अनेक कारणांमुळे शहरातील झोपडपट्ट्या कोरोना विषाणूच्या उद्रेकाची ठिकाणी बनू लागली आहेत. जीवघेणा उकाडा आणि हातावर पोट असल्याने घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही, अशा अनेक अडचणी तेथील उद्रेक नियंत्रित करण्यासाठी अडसर ठरत आहेत. 
 

राज्यातील पहिले कोरोनाचे रुग्ण 9 मार्चला पुण्यात आढळले. त्यानंतर 50 दिवसांमध्ये पुण्यातील रुग्णसंख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. रूग्ण वाढीचा मोठा वेग असलेला बहुतांश भाग हा शहरातील पेठा आणि झोपड्ड्यांचा असल्याचे दिसून आले आहे. सोसायटीतून सुरू झालेला हा विषाणू झोपडपट्ट्यांपर्यंत पोचला. नुसताच पोचला नाही, तर वेगाने त्यांचा फैलाव करू लागला असल्याचे असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी नोंदविले. 

Video : आठ बाय आठ फुटांच्या खोलीत, कसं पाळायचं डिस्टंसिंग?

सोसायट्यांमध्ये उद्रेक नियंत्रित 
सुरवातीचे रुग्ण सिंहगड रस्त्याच्या परिसरातील सोसायट्यांमध्ये आढळले. त्यानंतर कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत होते. वारजे-कर्वेनगर, औंध-बाणेर, कोथरुड-बावधन या भागांमध्ये मोठ्या संख्येने सोसायट्या आहेत. तेथील रहिवाशी लॉकडाऊनमध्ये आपापल्या घरात थांबले आहेत. घरातही सोशल डिस्टंसिंग पाळत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या भागातील कोरोनाच्या निदानाचे प्रमाण कमी झाले आहे. 

ठरलं : पुण्यात विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडणार

झोपडपट्टीतील एकेका घरात आठ-आठ रुग्ण 
शहरांमध्ये आता जे रुग्ण आढळतात, त्यातील बहुतांश हे झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आहेत. लॉकडाऊनमुळे बाहेर जाता येत नसले तरीही एकेका घरात आठ ते दहा लोकं रहात असल्याने सोशल डिस्टसिंग व्यवस्थित पाळणे शक्‍य होत नाही. त्यामुळे कोरोना फैसाव वाढत आहे. भवानी पेठ, येरवडा, ताडीवाला रोड, कोंढवा, पर्वती दर्शन या भागातील रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. एका घरातील आठ-आठ लोक पॉझिटीव्ह येत असल्याचे निरीक्षणंही यात टिपण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना निंयत्रणात झोपडपट्टी हे सगळ्यात मोठे आव्हान ठरले आहे. 


बारामतीकरांनो, पुढची चिंता सतावतेय, मग...

आव्हाने काय 
- दाटवस्तीचा भाग 
- जीवनमानाचा दर्जा कमी असणे 
- आरोग्य विषयी अज्ञान 
- सामाजिक, आर्थिक स्थिती बेताची 
- शिक्षणाचा अभाव 
- सर्वेक्षणासाठी सरकारी यंत्रणांना होणारा विरोध 

उपाययोजना 
- संसर्गाच्या संपर्काचा शोध घेणे यावर भर 
- रोगनिदान चाचण्यांचे वेगाने वाढविण्यात येणारे प्रमाण 
- कंन्टेटमेंट झोनची काटेकोर अंमलबजावणी 
- निर्जंतूकीकरण 
- झोपडपट्टीतील संशयीत लोकांना विलगिकरण करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com