पुणे : आता पोटपूजा झाली महाग, मोबाईल कसा खरेदी करू

मजुरांची व्यथा: कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान
पुणे : आता पोटपूजा झाली महाग, मोबाईल कसा खरेदी करू

उंड्री : कोरोना(Corona)महामारीमुळे मागिल दोन वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू केली असली तरी मोबाईल, नेट, रिचार्ज अशा अनेक अडचणी आहेत. दोन वेळची पोटपूजा करणे अवघड झाले आहे, त्यात हा खर्च कसा करायचा त्यासाठी शाळा(School) सुरू करणे हाच आमच्यासमोरील मुलांच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे आहे, अशा हृदयात कोंदलेल्या आवाजाने मजूरांनी व्यथा मांडली.

पुणे : आता पोटपूजा झाली महाग, मोबाईल कसा खरेदी करू
सोमवारपासून शाळेची घंटा पुन्हा वाजणार: शिक्षणमंत्र्यांची माहीती

परमेश्वर नागोराव कांबळे (रा. उंड्री, मूळ रा. आंबुरगा, ता मुखेड, जि. नांदेड), निवृत्ती रामा भोईवार (रा. उंड्री, मूळ – ता. देगलूर, जि. नांदेड), संजय घाटे (रा. उंड्री, मूळ बिल्लाई, ता. मुखेड, जि. नांदेड), सूर्यकांत व्यंकट कांबळे (रा. उंड्री. मूळ रा. दापका, ता. मुखेड, जि. नांदेड) म्हणाले की, साहेब.... आम्ही अडाणी राहिलो, आमच्या मुलाबाळांनी शिकावं असं आम्हाला मनापासून वाटतं आहे. मात्र, कोरोनामुळे रोजगार नाही, खर्च तरी कसा करायचा, मुलाबाळांना कसं शिकवायचं असा प्रश्न आमच्यापुढे पडला आहे.

पुणे : आता पोटपूजा झाली महाग, मोबाईल कसा खरेदी करू
शाळेची घंटा वाजणार; उद्यापासून पहिली-चौथीचे वर्ग होणार सुरू

कष्टकरी-कामगारांना दिवसभर काम केल्याबिगर संध्याकाळी चूल पेटत नाही. त्यात कोरोनामुळे रोजगारही मिळत नाही. पाच-दहा वर्षांपूर्वी रोजगार सहज मिळत होता. आता एक कामगार पाहिजे असेल, तर ठेकेदाराकडे दहाजण जमा होतात. त्यामुळे दररोज रोजगारही मिळत नाही. गावाकडे शेतामध्ये काम मिळत नाही म्हणून आलो शहराला, तर या ठिकाणीही तीच अवस्था झाली आहे. आम्ही अर्धपोटी राहतो पण मुलांना शिकवायचं ठरवलं आहे. मात्र, कोरोनामुळे शाळाच बंद आहेत, करायचं काय असा प्रश्न आमच्यासमोर ठाकला आहे, असे त्यांनी सांगितले.

भिवराबाई नागोराव कांबळे रा. उंड्री, मूळ- ता. मुखेड, जि. नांदेड म्हणाल्या आमचा मजुरांचा आवाज तुम्ही तरी शासनापर्यंत पोहोचवून मुलांची शाळा सुरू कधी होईल ते पाहा बरं का साहेब. सततच्या शाळा बंदमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिकतेवर परिणाम होत असून राज्य शासनाने नियमांचे पालन करून शाळा सुरू कराव्यात, अशी मनोमन आमची मागणी अशी भावना पोटतिडकीने मजूरवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com