तळ्यातील गणपती म्हणून प्रसिद्ध असलेले पेशवेकालीन गणेश मंदिर व श्री देवदेवेश्वर संस्थान मध्यभागी ठेवून हा विकास आराखडा करण्यात येणार आहे. त्यावेळी तेथील वृक्षांना, जैवविविधेतेला धक्का न लावता बागेच्या परिसराचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पुण्यात पहिले जैवविविधता केंद्र, ग्रंथालय, पर्यावरण अध्ययन आणि माहिती केंद्र, पहिली हेरिटेज पार्क, हंगामी फूलझाडांकरीता कायमस्वरूपी उद्यान उभारण्यात येणार आहे.
पुणे : शहराच्या मध्यवस्तीत असलेली सारसबाग आणि पेशवे पार्क या उद्यानांचा 50 एकत्रित कायापालट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पुढील वर्षभरात सारसबाग आणि पेशवे पार्कच्या 32 एकर जागेचा एकात्मिक विकास आराखडा तयार करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोटॅनिकल गार्डन 'पीपीपी' किंवा 'बीओटी' तत्त्वावर निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
तळ्यातील गणपती म्हणून प्रसिद्ध असलेले पेशवेकालीन गणेश मंदिर व श्री देवदेवेश्वर संस्थान मध्यभागी ठेवून हा विकास आराखडा करण्यात येणार आहे. त्यावेळी तेथील वृक्षांना, जैवविविधेतेला धक्का न लावता बागेच्या परिसराचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पुण्यात पहिले जैवविविधता केंद्र, ग्रंथालय, पर्यावरण अध्ययन आणि माहिती केंद्र, पहिली हेरिटेज पार्क, हंगामी फूलझाडांकरीता कायमस्वरूपी उद्यान उभारण्यात येणार आहे.
पुणे महापालिका अर्थसंकल्प : 1500 कोटी रूपयांहून अधिक अर्थिक तरतूद
सारसबागेची रचना रस्त्यालगत येणार असून त्यात वाहनतळ, हॉकर्स झोन, फूड प्लाझा अशा सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशी-विदेशी पर्यटकांसाठी हा परिसर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, अशा पद्धतीने ते विकसित करण्यात येणार आहे. तर शहरातील दिव्यांगां विषय जाणीव निर्माण व्हावी, यासाठी सुषमा स्वराज पार्क उभारण्यात येणार आहे. त्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पार्क मध्ये 42 प्रकाराची झाडे लावण्यात येणार सर्व भाषांसह ब्रेल लिपीतून दिली जाणार आहे.