पुणे महापालिका अर्थसंकल्प : 1500 कोटी रूपयांहून अधिक अर्थिक तरतूद

Financial provision is More than Rs 1500 crores in the Pune Municipal Budget
Financial provision is More than Rs 1500 crores in the Pune Municipal Budget

पुणे : महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यापासून ते शहरातील स्वच्छतागृहे स्मार्ट करणे, समान पाणी पुरवठ्यापासून ते 13 ठिकाणी ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूलाची उभारणी, स्मारके, दवाखाने, उद्याने मिडी बस अशा 86 योजनांवर साडेपंधराशे कोटीहून रूपयांहून अधिक रूपयांची अर्थिक तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

शहरातील वाहतूक, घनकचरा, आरोग्य, वाहतूक, पर्यावरण, सर्वांसाठी घरे यासह विविध समाज कल्याणकारी अशा सर्वाच प्रश्‍नांचा विचार करून तब्बल वीस पानी योजनाच या अर्थसंकल्पात सादर करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या इतिहास प्रथमच अशा प्रकारे या अर्थसंकल्पाच्या रूपाने घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टोलच्या दरात अठरा टक्क्यांनी वाढ

अर्थसंकल्पातील ठळक योजना   अर्थसंकल्पातील ठळक तरतूदी
-अंबील ओढा पुनर्विकास - 32.04 कोटी
-मुळा मुठा शुद्धीकरण प्रकल्पासाठी- 85 कोटी
-नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी -8 कोटी
-नालेसफाई- 7.50 कोटी
-वैकुंठ स्माशनभूमी पुनर्विकास -98 लाख
-कचरा प्रकल्पांसाठी- 40 कोटी
-ई कचरा संशोधन केंद्र- 1 कोटी
- कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प- 40 कोटी
-इलेक्‍ट्रिक चार्गिंग स्टेशन- 1 कोटी
-विविध ठिकाणीच्या उद्यानातील विकस कामे- 101कोटी 49 लाख
-महापालिकेच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्कासाठी - 31 कोटी 50 लाख
-महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिका- 45 लाख
-विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारणीसाठी- 2 कोटी
-शुक्रवार आणि सदाशिव पेठेत क्रिडासंकुल उभारणे- 3 कोटी
-क्रिडा धोरणासाठी -22 कोटी 50 लाख
-नव्याने समाविष्ट 11 गावांसाठी स्मार्ट व्हिलेज योजना- 2 कोटी
- परवडणाऱ्या घरे आणि पंतप्रधान आवास योजनासाठी - 68कोटी 85 लाख
-स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी- 40 कोटी
-स्मार्ट सिटीअंतर्गत कलाग्राम- 4 कोटी
-शिवसृष्टीसाठी - 26 कोटी
-जय गणेश सार्वजनिक गणेशोत्सव संग्राहलय- 5 कोटी
-कोथरूड येथे कला अकादमी- 20 कोटी
-आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक स्मारक सुशोभिकरण- 1 कोटी 80 लाख
-आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकासाठी- 22 कोटी
-लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मराठी साहित्य संमेलनासाठी- 1 कोटी
-शहरातील प्रवेशद्वारांचे सुशोभिकरण- 10 कोटी
-वारकरी सांस्कृतिक भवनसाठी- 2 कोटी
-हज हाऊससाठी 1 कोटी
-तुळशीबाग वॉकिंग प्लाझा-50 लाख
-हेरिटेज वॉक- 12 लाख
-वारसा जतन आणि संवर्धनसाठी 2 कोटी 50 लाख
-पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन- 3 कोटी 60 लाख
-कसबा मतदार संघात सीसीटीव्ही कॅमेरेसाठी 2 कोटी 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com