आता सर्पदंशावर आरोग्य केंद्रांतही उपचार उपलब्ध

Snake
Snake
Updated on

पुणे - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने हिवाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये श्‍वानदंश आणि सर्पदंश प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला आहे. यामुळे आता प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश आणि श्‍वानदंशावर उपचार उपलब्ध होणार आहेत.

हिवाळ्यात निर्माण होणाऱ्या दमट, उष्ण आणि थंडीच्या वातावरणामुळे बिळांतून बाहेर पडणाऱ्या सापांचे प्रमाण वाढते. तसेच, जिल्ह्यात भटक्‍या कुत्र्यांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे श्‍वान आणि सर्पदंश वाढण्याची शक्‍यता गृहीत धरून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आवश्‍यक खबरदारी घेण्यात येत आहे.

श्‍वान दंश झालेल्या व्यक्तीला ‘रेबीज’ होण्याचा धोका असतो. बारामती तालुक्‍यातील एका महिलेचा नुकताच यामुळे मृत्यू झाला. सर्पदंशामुळे अनेकदा रुग्ण दगावण्याची शक्‍यता असते. यावरील लसींसाठी खासगी दवाखान्यांमध्ये वारेमाप पैसे मोजावे लागतात. परिणामी, अनेक गरीब रुग्णांमध्ये खासगी दवाखान्यात उपचार घेण्याची कुवतही नसते. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. 

जिल्ह्यात ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यामध्ये श्‍वानदंशाच्या एकूण नऊ हजार ३९३ आणि सर्पदंशाच्या १४ हजार ९३७ लसींचा पुरवठा केला आहे. ऐनवेळी कोणीही या लसीपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडेही लसींचा राखीव साठा ठेवण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडेही श्‍वानदंशाच्या तीन हजार २०२ आणि सर्पदंशाच्या सात हजार ७७९२ लसींचा साठा उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The march demanded action on examination irregularities and called for accountability over issues affecting students.
Party workers also raised demands related to the Ayodhya Ram Temple donation issue during the programme.
Farmers received hands-on training on traditional rice cultivation techniques with support from the Maharashtra Gene Bank and agricultural experts.
The protesters have demanded immediate administrative action to remove the encroachment and reopen the road.
Marathi News Esakal
www.esakal.com