विलगीकरणासाठी आता 'विशेष तंबू'ची सुविधा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना संशयीत रुग्णांच्या थुंकींच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी पुरेशा लॅब नाहीत. यामुळे नुकतेच शासनाने खासगी लॅबमध्ये चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर यासंदर्भात उदय सामंत यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे  राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली. त्यात विद्यापीठात विज्ञान विभागाच्या अनेक लॅब असतात, त्याचा उपयोग आजारांच्या चाचणीसाठी करता येऊ शकते यावर चर्चा झाली. 

पुणे : देशात कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वैद्यकीय संसाधनांबरोबरच विलगीकरण कक्षांची मागणी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या आयुध निर्माण बोर्डच्या (ओएफबी) कानपूर येथील कारखान्यामध्ये विशेष तंबूंची निर्मिती केली जात असून यांचा वापर रुग्णालयांतर्फे विलगिकरणासाठी केला जात आहे. तसेच राज्य आणि वैद्यकीय प्रशासनाला हे तंबू कमी किंमतीत उपलब्ध करून दिले जात आहेत.

कानपूर येथील आयुध कारखान्यात दररोज सुमारे 30 अशा विशेष तंबूंची निर्मिती केली जात आहे. तसेच या मध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांसाठी सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच एक तंबू मध्ये दोन बेड्सची सुविधा देण्यात आली आहे. सामान्य तंबूंच्या तुलनेत हे कमी वजनाचे असल्यामुळे सहजपणे याला हलविण्यात येते. सध्या अरुणाचल प्रदेशामधल्या रुग्णांसाठी अशा पन्नास तंबूंची पुरवठा करण्यात आला असून सध्या आणखीन पाच राज्यांनी यांची मागणी केली असल्याची माहिती ओएफबीच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले.

सध्याची परिस्थिती पाहता या तंबूंचा उत्पादनाची संख्या वाढविण्यासाठी कानपूर सोबत चेन्नई येथील अवादी येथे असलेल्या आयुध कारखान्याची मदत घेतली जाणार आहे.

'विशेष तंबू'चे वैशिष्ट्य

- तंबू जलरोधक (वॉटरप्रूफ) असल्याने पावसाळ्यात काळजी नाही
- वैद्यकीय यंत्रणे व संसाधनांनी सज्ज
- दोन बेड्सची सोय
- माईल्ड स्टील व अल्युमिनियमचा वापर
- वजन सुमारे 10 किलो 
- व्हेंटिलेशनसाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे

"ओएफबीकडून सध्या मोठ्या प्रमाणावर इतर वैद्यकीय संसाधनांची निर्मिती केली जात आहे. तसेच राज्य प्रशासन किंवा इतर रुग्णालयांच्या मागणीनुसार त्यांना या वस्तू पुरविण्यात येत असून यांची किमंत देखील कमी ठेवण्यात आली आहे. या संसाधनांच्या किंमती 20 ते 30 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आल्या आहेत. त्यामुळे या सुविधा घेण्यास रुग्णालयांना अडचण येणार नाही."

- उद्दीन मुखर्जी, सहसंचालक ओएफबी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now a special tent for separation