Now the wedding match is on video conference  due to change in life style
Now the wedding match is on video conference due to change in life style

कोरोनाचा असाही परिणाम; आता रेशीमगाठी जुळतायेत व्हिडीओ कॉन्फरसवर

पुणे : कोरोनामुळे वधू-वर परियच मेळावा आयोजित करण्याला मोठा फटका बसला आहे. त्यावर आता व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या पर्याय विविध समाजांनी शोधला आहे. चितोडे वाणी समाजातील विवाहेच्छूक मुले-मुली व त्यांच्या पालक यांचा नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मेळावा पार पडला. देशाबराबेरच परदेशातील समाजाचे बांधव या मेळाव्यात सहभागी झाले आणि ऑनलाइनच्या माध्यमातून रेशीमगाठी जुळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले कोरोनामुळे लग्न जुळविणे या सामाजिक प्रक्रियेलाही खीळ बसली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लग्न समारंभाबरोबरच विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या मुला-मुलींचे लग्नासाठी निरोप येणे-देणे, बघणे आदी सर्व प्रकार बंद झाले. तसेच परिचय मेळावे देखील बंद झाले आहेत. परिणामी पालकवर्ग चिंतेत आहे. त्यावर चितोडे वाणी समाजातील द्वारकानाथ खरे, सारंग नवगाळे, मनोज वाणी यांनी एकत्र येत त्यावर "व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे" ऑनलाइन पद्धतीने विवाहेच्छूक मुले-मुली व त्यांच्या पालकांसाठी परिचय मेळाव्याची शक्‍कल लढविली. या उपक्रमाला समाजातूनही उत्स्फूर्त सहभाग मिळाला. एक दिवसाऐवजी दोन दिवस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मेळावा घेण्यात आला. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, कर्नाटक एवढेच नाही तर परदेशामधूनही एकूण 150 विवाहेच्छूक मुला-मुलींनी व त्यांच्या पालकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मेळाव्यात सहभाग घेतला. त्यातून रेशीमगाठी जुळण्यास मदत झाली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com