जनगणनेत ‘एनपीआर’ नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

तब्बल ३१ प्रश्‍न
प्रगणकाकडून ३१ प्रश्‍नांच्या आधारे माहिती भरून घेतली जाणार आहे. यात कुटुंबप्रमुखाचे नाव, घर क्रमांक, घराची स्थिती, कुटुंब सदस्यांची संख्या, लिंग, विवाहित- अविवाहितांची संख्या, पाण्याची उपलब्धता, शौचालय, सांडपाणी व्यवस्था, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट जोडणी, एलपीजी जोडणी, वाहनांची संख्या आदींची माहिती जनगणेच्या माध्यमातून घेतली जाईल.

पिंपरी - आगामी जनगणना एप्रिलपासून सुरू होणार आहे. यासाठी शहरात पाच हजार प्रगणक नियुक्त केले असून, प्रत्येकाला ‘मोबाईल ॲप’ सुविधा दिली जाणार आहे. त्यावरच माहिती नोंद करायची आहे. जनगणनेसह राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरचीही (एनपीआर) नोंदणी केली जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रीय जनगणनेचे काम एक मार्चपासून सुरू होणार आहे. याबाबतची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. दोन टप्प्यांत होणाऱ्या जनगणनेत भारतीय नागरिकत्वाची ओळख म्हणून ‘आधार कार्ड’प्रमाणे स्वतंत्र ओळखपत्रही दिले जाणार आहे. 

"तुम्हे सबकुछ कैसे आता है' म्हणत इतर विद्यार्थ्यांकडून 'त्याला' मारहाण

टप्पे
पहिला -
 एप्रिल ते सप्टेंबर २०२० या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन घरांची सूची तयार करतील.दुसरा : नऊ ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत जनगणना अंतिम केली जाईल. 

अधिकाऱ्यांची नियुक्ती
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर मुख्य जनगणना अधिकारी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील शहर जनगणना अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी (जार्च अधिकारी) यांच्यासह सहायक आयुक्त अण्णा बोदडे व चंद्रकांत इंदलकर यांची ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून नियुक्ती केली आहे. यांच्यासह निवडणूक विभागातील आरेखक उत्तम भारती व संगणक चालक पंकज पवार यांना पुण्यातील ‘यशदा’मध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

अधिकाऱ्यांची जबाबदारी
मास्टर ट्रेनर असलेले अण्णा बोदडे व चंद्रकांत इंदलकर हे प्रत्यक्ष कामकाज करणारे फिल्ड ट्रेनर यांना मे व जूनमध्ये प्रशिक्षण देतील. ६० फिल्ड ट्रेनर नियुक्त केले जाणार आहेत, त्यासाठी माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाकडून मागणी केली आहे. 

लोकसंख्यावाढ सत्तर टक्के
शहराची लोकसंख्या २००१ मध्ये दहा लाख सहा हजार ६२२ होती. २०११ मध्ये ती सतरा लाख २७ हजार ६५१ होती. लोकसंख्यावाढीचा हा दर सर्वसाधारणपणे सत्तर टक्के होता. हा दर ग्राह्य धरल्यास २०२१ ची अपेक्षित लोकसंख्या २९ लाख ३७ हजार ६ गृहीत धरण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NPR registration in Census