

HR leaders and industry experts discuss the role of the National Pension System in retirement planning at the Maharashtra HR Conclave in Baner, Pune.
esakal
कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे भविष्य सुरक्षित करणे आणि त्यातून संस्थेची दीर्घकालीन प्रगती साधणे, यासाठी मानवी संसाधन नेतृत्वाने | राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचा (एनपीएस) प्रचार करून जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. बाणेर येथे नुकत्याच पार पडलेल्या 'महाराष्ट्र एचआर कॉन्क्लेव्ह'मध्ये या विषयावर सविस्तर मंथन करण्यात आले. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) सकाळ माध्यम समूह आणि एनआयपीएम पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त पुढाकाराने बाणेरमध्ये महाराष्ट्र एचआर कॉन्क्लेव्ह झाली. परिषदेच्या पहिल्या सत्रात 'सीएचआरओ राउंड टेबल' चर्चासत्र पार पडले. निवृत्तीसाठी तयार संस्थांची उभारणी : एच. आर. नेतृत्व दृष्टिकोन हा चर्चेचा विषय होता. कर्मचाऱ्यांच्या भविष्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एचआर प्रमुखांनी योग्य धोरणे आखण्याची गरज यात अधोरेखित करण्यात आली. सकाळ माध्यम समूहाचे अनिरुद्ध हजारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.