esakal | संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या विचारांचे "नृत्यबानी'तून दर्शन 
sakal

बोलून बातमी शोधा

संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या विचारांचे "नृत्यबानी'तून दर्शन 

कवी, समाजसुधारक आणि संत या तीनही रूपात संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजांच्या विचार प्रणालीचे दर्शन "नृत्यबानी' या भरतनाट्यम नृत्याविष्कारातून रसिकांना घेता आले. 

संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या विचारांचे "नृत्यबानी'तून दर्शन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - "नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी', असे म्हणणाऱ्या संत नामदेवांनी आपल्या कीर्तन रंगातून केवळ महाराष्ट्रातील समाजालाच नव्हे, तर संपूर्ण जीवसृष्टीला समानतेचा मंत्र दिला. कवी, समाजसुधारक आणि संत या तीनही रूपात संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजांच्या विचार प्रणालीचे दर्शन "नृत्यबानी' या भरतनाट्यम नृत्याविष्कारातून रसिकांना घेता आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मध्ययुगीन भारतीय संत परंपरेतील पहिले बहुभाषिक आणि भ्रमणशील संत श्री नामदेव महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त ज्ञानदीप फाउंडेशनतर्फे रविवारी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी नूपुरनाद संस्थेच्या संचालिका डॉ. स्वाती दैठणकर म्हणाल्या, ""भरतनाट्यम्‌ शैलीशी साधर्म्य साधतील अशा या रचना बांधण्यात आलेल्या आहेत. मात्र, हे करीत असताना भरतनाट्यमच्या मूळ तत्त्वांना कुठेही बाधा पोचणार नाही आणि संत श्री नामदेव महाराजांच्या रचनेतला एकही शब्द इकडे-तिकडे होणार नाही, या दोन्ही गोष्टींची खबरदारी घेण्यात आली आहे. या रचना मुख्यत- पंजाबी आणि हिंदी भाषेतील असून, त्यामध्ये अनेक अस्खलित मराठी शब्दही आहेत. या लोभसवाण्या रचनांच्या शब्दांमध्ये दडलेले नृत्य आणि दोन ओळीतील आशय  नृत्याच्या माध्यमातून रसिकांसमोर पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे.'' कार्यक्रमाची संकल्पना प्राचार्य नि. ना. रेळेकर यांची, तर दिग्दर्शन डॉ. दैठणकर यांचे होते. 

loading image