esakal | एनटीएस शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
sakal

बोलून बातमी शोधा

exam

Breaking News : एनटीएस शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

sakal_logo
By
मिनाक्षी गुरव

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १३ डिसेंबर २०२० रोजी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध (एनटीएस) परीक्षेतून राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एनसीईआरटी, नवी दिल्ली) १३ जून २०२१ रोजी घेण्यात येणार होती. परंतु देशात व राज्यात सद्यःस्थितीनुसार कोरोना विषाणूंचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे शहरात ३५ वकिलांचा मृत्यू

दरम्य़ान, या परीक्षेच्या पुढील तारखा यथावकाश एनसीईआरटी आणि राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरून कळविण्यात येईल, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

हेही वाचा: म्युकरमायकोसिसचे पिंपरी-चिंचवडमध्ये ४१ रुग्ण