esakal | बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी : कोरोना पेशंटची संख्या होतीये कमी
sakal

बोलून बातमी शोधा

covid.jpg

शहरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी आज ब-यापैकी सुधारली. रुग्णसंख्येचा आकडा आज निम्म्याने खाली आल्याने सगळ्यांनाच हायसे वाटले. शनिवारी प्रतिक्षेत असलेल्या 19 व काल घेतलेल्या आरटीपीसीआर व रॅपिड अँटीजेन या दोन्ही मिळून 161 अशा 180 नमुन्यांमध्ये 26 जण पॉझिटीव्ह आले.

बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी : कोरोना पेशंटची संख्या होतीये कमी

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : शहरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी आज ब-यापैकी सुधारली. रुग्णसंख्येचा आकडा आज निम्म्याने खाली आल्याने सगळ्यांनाच हायसे वाटले. शनिवारी प्रतिक्षेत असलेल्या 19 व काल घेतलेल्या आरटीपीसीआर व रॅपिड अँटीजेन या दोन्ही मिळून 161 अशा 180 नमुन्यांमध्ये 26 जण पॉझिटीव्ह आले. यात शहराती 21 तर ग्रामीण भागातील 5 रुग्णांचा समावेश असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. बारामतीत लॉकडाऊननंतर रुग्णसंख्या तुलनेने कमी होऊ लागली आहे. आजपासून बारामतीचे व्यवहार सुरळीत सुरु झाले. शहरातील दुकानदारांनी पुरेशी काळजी घेत व्यवहार करावेत अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या. व्यापा-यांनीही आज काळजीपूर्वक या सूचनांचे पालन करण्यास प्रारंभ केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, बारामतीत रेमडीसिव्हिर इंजेक्शनचा पुरेसा साठा असेल याची काळजी घेत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरिक्षक विजय नांगरे यांनी दिली. या संदर्भात काहीही तक्रारी असतील तर बारामतीतील नागरिकांनी विजय नांगरे (73875 61343) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

आरोग्य सुविधांचे ‘ऑपरेशन’ गरजेचे! 

बारामती शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सिजन लेव्हलची तपासणी शहराच्या वेशीवर नियंत्रण कक्ष उभारुन व्हायला हवी, अशी मागणी बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे काल झालेल्या व्यापा-यांच्या बैठकीत केली होती. या मुळे प्रवास करुन येणा-यांच्या नोंदी राहतील. 

हतबल प्रशासनापुढे ‘जम्बो’ समस्या!

बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे कामकाज सुरु झाले असल्याची माहिती डॉ. सदानंद काळे यांनी दिली. टप्याटप्याने या अतिदक्षता विभागात 20 रुग्णांची सुविधा उपलब्ध होणार आहे.