बारामतीची वाटचाल पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने?

बारामतीची वाटचाल पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने?
Updated on

बारामती :  शहरातील कोरोना रूग्णांच्या संख्येने आज विक्रम मोडला. बारामती शहरात एकाच दिवशी आज तब्बल 163 रूग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे आता पुन्हा एकदा बारामती शहरात लॉकडाऊन करावे लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे 163 रुग्ण पॉझिटीव्ह आलेले असले तरी अजूनही 158 रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत असल्याने काळजी अधिकच वाढली आहे. बारामतीत कोरोनाचा उद्रेक झाल्यासारखीच आजची स्थिती आहे. 

दरम्यान बारामतीत काल 633 रुग्णांचे नमुने तपासले गेले.  कोरोना सुरू झाल्यापासूनची रुग्णांचे स्वॅब तपासण्याची ही विक्रमी संख्या आहे.  इतक्या मोठ्या संख्येने तपासणी होत असल्यामुळे रुग्ण संख्येचा आकडा देखील वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

बारामतीत दिवसागणिक वाढणारा रुग्णांचा आकडा हा सर्वांचीच झोप उडविणारा ठरत आहे. संध्याकाळी सात ते सकाळी नऊ वाजेपर्यंत बारामती शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत,  तरीही रुग्ण संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही.  बारामती शहरातील नागरिक नियम पाळत असल्याने रुग्ण संख्या वेगाने वाढते आहे,  अनेक ठिकाणी गर्दीत लोक सहभागी होत आहेत.  विना मास्क बिनधास्त लोक फिरत आहेत,  याशिवाय सोशल डिस्टंसिंग देखील अनेक ठिकाणी पाळले जात नाही नाही,  असे चित्र आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांकडून मास्कबाबत वारंवार दंडात्मक कारवाई करुनही मास्कचा वापर न करणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे.  एकीकडे प्रशासनाने उपाय योजना हाती घेतलेल्या असल्या तरी रुग्णालयातील रुग्णांची संख्या मात्र प्रचंड वेगाने वाढते आहे.  बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नटराज नाट्य कला मंडळाकडून चालविली जाणारी  दोन्ही कोव्हिड केअर सेंटर हाऊसफुल झाली असून आता माळेगाव येथील कोव्हिड केअर सेंटर आजपासून सुरू करावे लागणार आहे.

या संकटावर मात करण्यामध्ये नागरिकांची भूमिका सर्वाधिक महत्वाची आहे. पुरेशी काळजी घेतली गेली तर आपोआप हा आकडा कमी होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.  बारामतीतील रुग्णांचा आकडा मोठा दिसत असला तरी गंभीर किंवा ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे,  अशा रुग्णांचे प्रमाण नगण्य आहे.

तपासणी अधिक असल्याने रुग्णही अधिकच-
पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये तपासण्यांची संख्या नगण्य आहे,  बारामतीत विक्रमी संख्येने तपासणी होत असल्यामुळे रुग्णसंख्या देखील मोठी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तपासणी संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व सुपर स्प्रेडरची तपासणीही वाढवली गेली आहे. 

लसीकरणालाही वेग-
एकीकडे तपासण्यांची संख्या वाढवली गेली असून दुसरीकडे लसीकरण मोहिमेलाही वैद्यकीय प्रशासनाने वेग दिला आहे. लसीची कमतरता भासणार नाही या दृष्टीने नियोजन केले असून नियमित सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयासह खाजगी दवाखान्यातही लसीकरण सुरु आहे. या आठवड्यात पाच हजार जणांना लस देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com