'या'मुळे पुण्यात वाढली कोरोनाची रुग्णसंख्या; आरोग्य अधिकाऱ्यांनीही केलं मान्य!

Corona-Virus
Corona-Virus

पुणे : अनलॉकच्या पहिल्या टप्प्यातच पुणेकरांनी ‘सोशल डिस्टसिंग’ला हरताळ फासला. त्यामुळे पुण्यातील पाच हजार अॅक्टिव्ह रुग्णांपैकी दोन हजार 189 रुग्ण (44 टक्के) गेल्या पाच दिवसामध्ये आढळले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

राज्यातील पहिला कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेला रुग्ण पुण्यात 9 मार्चला आढळळा. त्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांचे निदान होऊ लागले. देशातील इतर राज्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढले. कोरोना विषाणूंच्या उद्रेकावर नियंत्रणासाठी देशात 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. त्यामुळे नागरिक घरातच बसले. त्यातून कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या नियंत्रित राहिली.

पण, आता अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात बहुतांश पुणेकर कामाच्या निमित्ताने घराबाहेर बाहेर पडले. यात ‘सोशल डिस्टसिंग’चा बोजवारा उडाला. त्यामुळे गेल्या पाच दिवसांमध्ये पुण्यात दोन हजारांवर नवीन रुग्णांचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. 

पुण्यातील कोरोनारुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. याबद्दल बोलताना महाराष्ट्र राज्याचे साथ रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, “पुण्यासह राज्यात कोरोना निदान चाचण्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढण्यामागे ते एक कारण आहे. तसेच, अनलॉकनंतर रुग्णसंख्या वाढणार हे अपेक्षित होतेच. लॉकडाऊन बहुतांश नागरिक घरात असल्याने रुग्णसंख्या नियंत्रणात होती. पण, अनलॉकमध्ये नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे ही संख्या वाढणे स्वाभाविक आहे.

या सगळ्याचे फायदे-तोटे विचारात घेऊन निर्णय घेतले जात आहेत. याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम हे कोरोनाइतकेच किंबहुना त्याहीपेक्षा भयंकर आहेत, हे आता लक्षात येत आहे. त्यामुळे अनलॉकचा निर्णय घेण्यात आला. सगळं पाळूनही घराबाहेर पडल्यानंतरही काही प्रमाण संसर्ग होण्याचा धोका राहणारच. त्यामुळे पुढील काही दिवस रुग्णसंख्या वाढेल. पण, संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःची दुसऱ्याची काटेकोर काळजी घेतलीच पाहिजे.”

महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, “या विषाणूंचा संसर्ग तीव्रगतीने होतो. त्यातच अनलॉक प्रक्रियेमुळे नागरिकांनी पूर्वीप्रमाणे गर्दी करायला सुरवात केली आहे. सुरक्षित अंतर ठेवले जात नाही, त्याचा दृष्यपरिणाम म्हणजे रुग्णसंख्या वाढत आहे. ”

पुण्यात रुग्णांची संख्या वाढीची कारणे :-
- पुण्यात रोज तीन हजारांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या होतात. 
- कोरोना चाचणीसाठी नमूने घेण्याची गुणवत्ता वाढली आहे. 
- शहरातील पॉझिटीव्हीटी रेट वाढला आहे
- काही दिवसांपर्यंत 100 नमून्यांमधील 10 पॉझिटीव्ह असयाचे आता हे प्रमाण 18 पर्यंत वाढले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com