दिवसेंदिवस खराडीकरांची डोकेदुखी वाढतीये कारण...

सुषमा पाटील
सोमवार, 13 जुलै 2020

खराडी, विमाननगर, कल्याणीनगर, वडगावशेरी, लोहगाव या परिसरात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या ही नागरिकांसाठी चिंता  वाढवणारी आहे. तीन दिवसात 70 पेक्षा जास्त रुग्ण चंदननगर, खराडी येथे आढळून आले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढती संख्या ही प्रशासनाची डोकेदुखी ठरत असल्याने  अत्यावश्यक  कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

रामवाडी (पुणे) : खराडी, विमाननगर, कल्याणीनगर, वडगावशेरी, लोहगाव या परिसरात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या ही नागरिकांसाठी चिंता  वाढवणारी आहे. तीन दिवसात 70 पेक्षा जास्त रुग्ण चंदननगर, खराडी येथे आढळून आले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढती संख्या ही प्रशासनाची डोकेदुखी ठरत असल्याने  अत्यावश्यक  कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नगररोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चार ही  प्रभागातील कोरोना रुग्णांची संख्या 944 वर जाऊन पोहचली आहे.

पुणेकरांनो, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार 

यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे तर 430 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 280 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. होम क्वारंटाइन 24 आहेत. मार्च महिन्यात कल्याणीनगर येथे प्रथम कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. प्रभाग- तीन (विमाननगर सोमनाथनगर ) मध्ये एकूण 270 रुग्ण आढळले होते. या पैकी 165 जणांना डिस्चार्ज दिला आहे आणि 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच  91 रुग्णांवर उपचार सुरु आहे आणि  5 जणांना होम क्वारंटाईन आहे.  प्रभाग चारमध्ये खराडी चंदननगर मध्ये एकूण 281 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 132 रुग्णांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 137 रुग्णांवर उपचार सुरु आहे आणि 6 जण होम क्वारंटाईन आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

प्रभाग पाचमध्ये एकूण 273 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 96 जणांना डिस्चार्ज दिला आहे व 4 जणांचा मृत्यू झाला आहे. 169 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. होम क्वारंटाईन 4 आहेत. प्रभाग 42 पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या लोहगाव  परिसरात एकूण 120 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 37 जणांना डिस्चार्ज दिला आहे तर 74  रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर 9 होम क्वारंटाईन आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्ण हे खराडी परिसरात आहे. थिटेवस्ती, तुकारामनगर, खराडी परिसर, गणेशनगर येथे आहे. त्या खालोखाल वडगावशेरी व कल्याणीनगर येथील कॉलनी व सोसायटीचा परिसर, तसेच गांधीनगर, बर्माशेल कॉलनी -सम्राट चौक, यमुनानगर -विमाननगर,  लोहगाव परिसर, साठे वस्ती संतनगर येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रभाग 42 मध्ये इतर प्रभागाच्या तुलनेने रुग्ण संख्या कमी आहे. तसेच मृत्यू हा शून्य आहे. परिसरात कोरोना रुग्ण संख्या वाढत असून काही नागरिक विना मास्क फिरणे,  सोशल डिस्टन्सचे पालन न करणे, स्वतःची तसेच सार्वजनिक स्वच्छता न राखणे, कोरोनाच्या काळात घरगुती पार्ट्यांवर अधिक भर दिला जात आहे, असे प्रकार घडत असल्याची  नागरिकांकडून तक्रार करण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

4 जुलैपर्यंत जी कोरोना रुग्ण संख्या होती. ती 13 जुलैपर्यंत कमी न होता वाढत गेली.
प्रभाग 3 सोमनाथनगर- विमाननगरमध्ये  एकूण रुग्ण संख्या ती  211 होती. ती 270 वर पोहचली. प्रभाग 4  चंदननगर -खराडी मध्ये एकूण रुग्ण संख्या  - 192 होती ती  281 वर पोहचली. प्रभाग 5 वडगावशेरी- कल्याणीनगरमध्ये एकूण रुग्ण संख्या  - 178 होती ती  273 वर पोहचली आणि प्रभाग 42 -लोहगाव परिसरमध्ये एकूण रुग्ण संख्या - 75 होती  ती 120 वर पोहचली. रुग्णांची  संख्या कमी न होता ती वाढली आहे. नगररोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कोरोना रुग्णांची संख्या कमी न होता वाढतच आहे. यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच लॉकडाउनच्या काळात नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patients in Kharadi increased