कोरोनानं पुण्यातनं ठोकली धूम; आता जिल्हा होणार कोरोनामुक्त!

कोरोनानं पुण्यातनं ठोकली धूम; आता जिल्हा होणार कोरोनामुक्त!

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील सक्रीय (अॅक्टिव्ह) कोरोना रुग्णांची संख्या मागील आठ दिवसांपासून सातत्याने झपाट्याने कमी होऊ लागली आहे. चालू आठवड्यात ९ हजार ८६९ सक्रीय रुग्ण कमी झाले आहेत. सध्या दररोज सरासरी १ हजार २३३ हे सक्रीय रुग्ण कमी होत आहेत. यानुसार येत्या तीन आठवड्यात म्हणजेच ७ नोव्हेंबरपर्यंत पुणे जिल्हा पुर्णपणे कोरोनामुक्त होण्याचे संकेत मिळाले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील आठ दिवसांपासून सातत्याने नवीन रुग्णांची संख्या कमी होत असून रोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याबरोबरच रुग्णालय आणि घरात उपचार घेत असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत आहे. आरोग्य विभागाच्यावतीने रोज प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या आकडेवारीच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.

पुणे शहर व जिल्ह्यात ८ आॅक्टोबर ते १५ आॅक्टोबर या आठवड्यात एकूण १२ हजार २७४ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. याऊलट या आठवड्यात २१ हजार ७७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आठवड्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ही नवीन रुग्णांपेक्षा ९ हजार ५०१ ने अधिक आहे.

सद्य: स्थितीत शहर व जिल्ह्यात एकूण २३ हजार ८०३ सक्रीय रुग्ण आहेत. ७ आॅक्टोबरला रुग्णांचा हाच आकडा ३३ हजार ६७२ होता. म्हणजेच चालू आठवड्यात एकूण ८ हजार ८६९ सक्रीय रुग्ण कमी झाले आहेत. या आठवड्यात एकूण ७२ हजार ८३४ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

पुणे शहरात ९ मार्च २०२० ला राज्यातील पहिला कोरोना रुग्ण सापडला होता.  आज कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही ३ लाख ११ हजार ६२७ झाली आहे. यापैकी २ लाख ८० हजार ५७७ कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय ७ हजार ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

आठवड्यातील तारिखनिहाय कोरोना स्थिती

( तारीख, नवे रुग्ण, कोरोनामुक्त रुग्ण आणि सक्रीय रूग्ण या क्रमाने) 

- तारीख ---- नवे रुग्ण ---- कोरोनामुक्त ---- सक्रीय रूग्ण 

- ८ आॅक्टोबर ---- २०३९ ---- २७०७ ---- ३२ हजार ९४७.

- ९ आॅक्टोबर ---- १९५७ ---- २०८७ ---- ३२ हजार ७७३.

- १० आॅक्टोबर --- १७९५ ---- २०८४ ---- ३२ हजार ४४२.

- ११ आॅक्टोबर --- १७२०--- २७९० --- ३१ हजार १४९.

- १२ आॅक्टोबर ---- ९८८ --- ३१२६ ---- २९ हजार १४४.

- १३ आॅक्टोबर ---- १३४१ ---- ३३१५ ---- २६ हजार ९७६.

- १४ आॅक्टोबर ---- १२३७ ---- ३१३३ ---- २५ हजार १७७.

- १५ आॅक्टोबर ---- ११९७ ---- २५३३ ---- २३ हजार ८०३.

आठवड्यातील तारिखनिहाय कोरोना चाचण्यांची संख्या 

-  ८ आॅक्टोबर ---- १० हजार १२३.

- ९ आॅक्टोबर ---- ११ हजार १८४.

- १० आॅक्टोबर ---- ९ हजार ४२५.

- ११ आॅक्टोबर ---- ९ हजार ४०५.

- १२ आॅक्टोबर ---- ६ हजार १९.

- १३ आॅक्टोबर ---- ९ हजार १८०.

- १४ आॅक्टोबर ---- ८ हजार ४८८.

- १५ आॅक्टोबर ---- ९ हजार १०

- एकूण चाचण्या ---- ७२ हजार ८३४. 

शहर, जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोना स्थिती 

- एकूण कोरोना चाचण्या ---- १३ लाख १७ हजार ८४.

- एकूण कोरोना रुग्ण ---- ३ लाख ११ हजार ६२७.

- कोरोनावर विजय मिळवलेले रुग्ण ----  २ लाख ८० हजार ५७७.

- सध्याचे एकूण सक्रीय रुग्ण ---- २३ हजार ८०३.

- आतापर्यंत झालेले मृत्यू ---- ७ हजार ३३५.

- चालू आठ दिवसांत कमी झालेले सक्रीय रुग्ण --- ९ हजार ८६९.

- दररोज सरासरी कमी होणारे सक्रिय रुग्ण --- १ हजार २३३.

- आठ दिवसांतील दररोजचे सरासरी नवे रुग्ण ---- १ हजार ५३४.

- आठ दिवसांतील दररोज बरे होणारे सरासरी रूग्ण --- २ हजार ७२१.

( संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com