पुणे : आकडा वाढतोय; जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४ हजारांवर!

Corona-Victims
Corona-Victims

पुणे : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रविवार (ता.17) पर्यंत 4001 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 1960 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या (ॲक्टिव्ह रुग्ण) 1842 एवढी आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 199 रुग्णांचा मृत्यू झाला असून 157 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4593 इतकी आहे. विभागातील 2218 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात एकूण 229 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 168 रुग्ण गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शनिवारच्या (ता.17) बाधित रूग्णांच्या संख्येच्या तुलनेत आज रुग्ण संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 281, सोलापूर 25 , कोल्हापूर 7, सांगली 6 आणि सातारा जिल्ह्यात 3 अशी वाढ झाली आहे.

दरम्यान, शनिवारी पुणे शहरात कोरोनाने हाहाकार उडवला होता. कारण शनिवारी दिवसभरात 202 रुग्ण सापडल्याने आजपर्यंतच्या साऱ्या आकड्यांचे उच्चांक मोडले. कोरोनाचा आवाका एवढ्यावरच थांबला नाहीत तर त्याने दिवसभरात 11 रुग्णांचा जीव घेतलाय. तर 150 रुग्णांची स्थिती गंभीर आहे. गेली आठवडाभर कोरोनामुक्तांची संख्याने वाढल्याने दिलासा मिळालेले पुणेकर रुग्ण संख्या वाढल्याने हबकले आहेत.

पुण्यात याआधी सर्वाधिक 166 रुग्ण सापडले होते. त्यानंतर काही दिवस ही संख्या कमी होत, ती शंभरीपर्यंत आणि शंभरीच्या आतच आली. रोज नव्या रुग्णांची संख्या कमी होईल आणि घरी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढण्याची आशा होती. मात्र, शनिवारी अचानक नव्या रुग्णांची संख्या 202 पर्यंत गेली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com