पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदानाचा आकडा अन् खर्चही घटणार; 'हे' आहे कारण

The number of Degree conferred and expenses of Graduation Ceremony of Pune University will also decrease
The number of Degree conferred and expenses of Graduation Ceremony of Pune University will also decrease

पुणे: अंतीम वर्षाच्या परीक्षाच न झाल्याने निकाल त्यांचा निकालही लागणार लागलेला नाही. त्याचा परिणाम यंदाच्या पदवी प्रदान सोहळ्यावर होत असून, पदवी प्रमाणपत्र वाटपाचा मोठ्या प्रमाणात आकडा घटणार आहे. तर हा कार्यक्रम ऑनलाईन घ्यावा लागत असल्याचे मांडवापासून इतर सर्व अनेक गोष्टींचा लाखो रुपये खर्च बचत होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ वर्षभरात दोन टप्प्यात होत आहेत. पहिला पदवी प्रदान समारंभ ऑगस्ट महिन्यात तर, दुसरा समारंभ जानेवारी महिन्यात घेतला जातो. या दोन्ही कार्यक्रमांसाठी किमान एक लाख विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला असतो. तर, नविन नियमानुसार पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र वाटप विद्यापीठ स्तरावर तर पदवी प्रमाणपत्र महाविद्यालय स्तरावर कार्यक्रम घेऊन वाटप केले जात होते. पुणे विद्यापीठात पदवी प्रदान कार्यक्रमासाठी मुख्य इमारतीच्या मागच्या मैदानावर मोठा मांडव टाकून दिमाखदार कार्यक्रम घेतला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द झाला आहे. 

नोंदणी कमी होणार 
दरवर्षी जून-जुलै महिन्यात निकाल लागल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पदवी प्रदान समारंभ होतो. मात्र यंदा अंतीम वर्षाची परीक्षाच झाली नाही, त्यामुळे निकाल कधी लागणार हे सुद्धा माहिती नसल्याने  प्रमाणपत्रासाठी नोंदणी घटणार आहे. यंदा केवळ जे विद्यार्थी पुर्वीच पदवीधर झाले आहेत, पण त्यांनी प्रमाणपत्र घेतले नव्हते असेच विद्यार्थी  नोंदणी करतील. त्यामुळे उशीरा प्रमाणपत्र घेणार्यांचाही अाकडा समोर येऊ शकतो, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले. 


किरकोळ खर्च येणार....
पुणे विद्यापीठातील समारंभासाठी १ कोटीची तरतूद आहे. यामध्ये ८० टक्के खर्च पदवी प्रदान कार्यक्रमावर होतो. तर, मांडव, खुर्चा, साऊंड सिस्टीम यासह इतर गोष्टींसाठी  स्वतंत्र खर्च येतो. मात्र, यंदा ऑनलाईन पदवी प्रदान समारंभ होणार आहे. यात ऑनलाईन येणारे प्रमुख पाहुणेही मोजके असतील. व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य आदी ऑनलाईन सहभागी होतील. त्यामुळे अवघ्या काही हजार रुपयात हा कार्यक्रम पार पाडणार आहे. 

Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!

"यंदा अंतीम वर्षाच्या परीक्षा झालेल्या नाहीत, त्यामुळे निकालही लागलेला नाही. त्यामुळे पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल. तसेच ऑनलाईन कार्यक्रम होणार असल्याने निधीची बचत होईल."
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, पुणे विद्यापीठ

तक्ता
जानेवारी २०२० मध्ये प्रमाणपत्र प्राप्त केलेले विद्यार्थी
पदवी - ८७,०९१ 
पदव्युत्तर पदवी - २१,६७५ 
पीएचडी -  ३८९
एमफील - ७१, 
पदविका ४६५ 
पदव्युत्तर पदविका - २२७
एकुण  - १०९११८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com