Corona Update - पुण्यात आज कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या अधिक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये 764, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 895, नगरपालिका क्षेत्रात 216 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 87 नवे रुग्ण सापडले आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील सर्वाधिक 40 जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 12, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 24, नगरपालिका क्षेत्रातील 5 आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.​

पुणे - पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.30) दिवसभरात 3 हजार 298 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील 1 हजार 336 जणांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासात 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये 764, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 895, नगरपालिका क्षेत्रात 216 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 87 नवे रुग्ण सापडले आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील सर्वाधिक 40 जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 12, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 24, नगरपालिका क्षेत्रातील 5 आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही काल (ता.29) रात्री 9 वाजल्यापासून आज (ता.30) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेचा मार्ग सुकर; वेळापत्रक जाहीर करण्यास सुरवात

दरम्यान, दिवसभरात 3 हजार 58 कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 1 हजार 431, पिंपरी चिंचवडमधील 827, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 633, नगरपालिका क्षेत्रातील 156 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 11 जण आहेत. आज अखेरपर्यंत जिल्ह्यातील 6 हजार 529 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये शहरातील सर्वाधिक 3 हजार 615, पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 318, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 1 हजार 34, नगरपालिका क्षेत्रातील 366 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 176 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 267 रुग्ण आहेत.

पुणे जिल्ह्यातील वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने झेडपीत थाटले कार्यालय

जिल्ह्यातील आज अखेरपर्यंतची कोरोना स्थिती
- कोरोना चाचण्यांची एकूण संख्या --- 11 लाख 68 हजार 658.
- एकूण कोरोना रुग्ण --- 2 लाख 84 हजार 21.
- आतापर्यंत कोरोनामुक्त झालेले रुग्ण --- 2 लाख 38 हजार 412.
- कोरोनामुळे झालेले मृत्यू --- 6 हजार 529.
- सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण --- 22 हजार 627.
- घरातच उपचार घेणारे कोरोना रुग्ण --- 16 हजार 426.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number new patients in Pune today is more than the number of corona free