पुणे जिल्ह्यात वाढतेय चिंकाऱ्यांची संख्या

पुणे जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये चिंकारा या वन्य प्राणी निदर्शनास येण्याचे प्रमाण वाढले आहे.
पुणे जिल्ह्यात वाढतेय चिंकाऱ्यांची संख्या
Updated on
Summary

पुणे जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये चिंकारा या वन्य प्राणी निदर्शनास येण्याचे प्रमाण वाढले आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यातील (Pune District) वनपरिक्षेत्रात २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये चिंकारा (Chinkara) या वन्य प्राणी निदर्शनास येण्याचे प्रमाण वाढले आहे. वन विभागाच्या नोंदीनुसार २०१७ मध्ये विविध तालुक्यांमध्ये सुमारे ९०, तर २०१८ दरम्यान १४० हून अधिक चिंकारांची नोंद झाली असल्याचे वन विभागाद्वारे केलेल्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे.

पुणे जिल्ह्यात २५ हून अधिक दुर्मिळ प्रजातीचे वन्यप्राणी व पक्षी आढळतात. वन विभागाने २०१७ आणि २०१८ मध्ये केलेल्या वनपरिक्षेत्रातील पाहणीनुसार पुण्यातील चिंकाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनाकाळात २०२० आणि २०२१ या कालावधीत वन विभागाच्या वतीने अशा प्रकारची निरीक्षणे घेण्यात आली नाही. कोरोनामुळे हे काम करणे शक्य झाले नसल्याचे वन विभागाने म्हटले आहे.

पुणे वन विभागाच्या वतीने ताम्हिणी, पुणे, दौंड, बारामती, वडगाव, इंदापूर, भांबुर्डा, पौड सारख्या वन परिक्षेत्रात निदर्शनास आलेल्या वन्यप्राण्यांची संख्या नोंदविण्यात आली आहे. यामध्ये ससा, रानडुक्कर, भेकर, रानकोंबडा, मोर, कोल्हा, टिटवी, हरिण, चिंकारा, साळींदर, बिबट, नीलगाय, आदी वन्य प्राण्यांचा समावेश आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी शासकीय प्रयत्नांबरोबर सामान्य लोकांमध्ये जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे दुर्मिळ किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्यप्राणी किंवा पक्षी यांचे संवर्धन करणे अधिक सोपे होईल, असेही वन विभागाने सांगितले.

पुणे जिल्ह्यात वाढतेय चिंकाऱ्यांची संख्या
श्रीमंतीमध्ये पुणेकर देशात तिसऱ्या स्थानावर

वन्यजीव आढळल्यास काय करावे ?

  • वन्यप्राणी आढळल्यास वन विभागाला त्वरित कळविणे.

  • नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे वन्यप्राणी घाबरतात किंवा आक्रमक होतात, त्यामुळे नागरिकांनी प्राण्यांपासून लांब राहणे.

  • वन्यप्राणी दिसल्यास नागरिकांनी त्याच्याभोवती गर्दी करणे टाळावे.

जिल्हयात आढळणारे वन्यप्राणी

शेकरू

रानडुक्कर

भेकर

घोरपड

रानमांजर

उदमांजर

खार

तरस

साळींदर

चितळ

सायाळ

मोर

खोकड

बिबट

लांडगा

कोल्हा

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले वन्यप्राणी व पक्षी

  • खवले मांजर

  • चौशिंगा

  • लांडगा

  • गरुड

  • इजिप्शियन गिधाड

वन्य प्राण्यांच्या एकूण नोंदी

  • २०१७ - २७५७

  • २०१८ - २९८

पुणे जिल्ह्यात वाढतेय चिंकाऱ्यांची संख्या
पुणे जिल्ह्यात बुधवारी १३० नवे कोरोना रुग्ण

गेल्या अनेक वर्षांपासून लांडग्यांची संख्या किती आहे याचा अभ्यास करण्यात आलेला नाही, तसेच त्यांच्या संरक्षणासाठी विशिष्ट प्रकारच्या धोरणांचीही रचना करण्यात आलेली नाही. पुण्याच्या आसपासच्या परिसरात हा वन्यप्राणी आढळतो. वन्यप्राण्यांची गणना योग्य प्रणालीद्वारे करणे आवश्‍यक आहे.

- मिहीर गोडबोले, संस्थापक-ग्रासलँड ट्रस्ट

वन्य प्राणी म्हणले की सर्वप्रथम वाघ आणि बिबट हे डोळ्यासमोर येतात. यातील बिबट हा वन्यप्राणी पुणे जिल्ह्यात आढळतो. गेल्या काही वर्षांपासून मानव-बिबट्या संघर्षाच्या घटना निश्‍चितच कमी झाल्या आहेत. यामागे तालुका आणि जिल्हा स्तरावर केलेल्या व्यवस्थापनाचा परिणाम आहे.

- डॉ. विद्या अत्रेय, वन्यजीव अभ्यासक

केवळ वाघ, बिबट अशा वन्य प्राण्यांनाच प्राधान्य न देता स्थानिक दुर्मिळ प्रजातींचे संवर्धनदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. यामध्ये कोंडाणा उंदीर, खवले मांजर, शेकरू आदी प्राण्यांचा समावेश आहे. प्रशासनासह स्थानिक लोकांच्या सहभागातून हे साध्य केले जाऊ शकते.

- सचिन पुणेकर, अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Strict Action Against Rule Violators as State Launches POSH Law Inspection Drive
Railways Announces Sunday Mega Block at Pune Station; Services May Be Affected
Umesh Ranawade Calls Off Fast After 48-Hour Deadline for Palkhi Honor Decision
Pune Metro Stations in Final Sprint as Authorities Aim for July 15 Launch
Marathi News Esakal
www.esakal.com