पुण्यातील विक्रीस उपलब्ध घरांची संख्या सात वर्षांत नीचांकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home
पुण्यातील विक्रीस उपलब्ध घरांची संख्या सात वर्षांत नीचांकी

पुण्यातील विक्रीस उपलब्ध घरांची संख्या सात वर्षांत नीचांकी

पुणे - लॉकडाउनमुळे (Lockdown) घटलेली विक्री, त्यानंतर बांधकामासाठी (Construction) उपलब्ध न झालेले कामगार (Worker) आणि महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) (Maharera) अस्तित्वात आल्यानंतर झालेले परिणाम (Effect) यामुळे शहरात विक्रीसाठी (Selling) उपलब्ध असलेल्या घरांची (Home) संख्या जुलै ते डिसेंबर २०२१ अखेरीस गेल्या सात वर्षांतील नीचांकी पातळीवर आली आहे.

सध्या शहरात ७१ हजार ७७८ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नोंदणी असलेल्या ३ लाख ११ हजार ८९३ सदनिका २०२१ अखेरपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होत्या. त्यातील ७६.९० टक्के म्हणजे २ लाख ४० हजार ११५ सदनिकांची आतापर्यंत विक्री झाली आहे. शहरातील निवासी बांधकाम क्षेत्राचा आढावा गेरा पुणे रेसिडेन्शियल रिअल्टी अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात या बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे प्रकल्प रखडल्यामुळे पुण्याच्या निवासी स्थावर मालमत्तेच्या बाजारपेठेतील पुरवठ्यातील तूट भरून काढण्यासाठी विकासकांनी एकत्रितपणे सुरुवात केली आहेत.

गेल्या ६ महिन्यांत ६१ हजार १५१ नवीन घरे बाजारात जोडली गेली आहेत. किंमत विभागांनुसार नवीन लाँचची वार्षिक माहिती पाहता प्रीमिअम प्लस आणि लक्झरी विभागांमध्ये सर्वांत मोठा फायदा झाला आहे. प्रीमिअम प्लस विभागाचे वर्गीकरण ६ हजार ११ आणि ७ हजार ५१३ प्रति चौरस फूट किमतीच्या श्रेणीत केले आहे. तर लक्झरी विभागाचे वर्गीकरण ७ हजार ५१३ प्रति चौरस फूट पेक्षा जास्त आहे. या दोन्ही विभागांमध्ये मागील एका वर्षात नवीन पुरवठा अनुक्रमे ८१ आणि ५३ टक्क्यांनी वाढला आहे, असे अहवालात नमूद आहे.

हा अहवाल पुण्याच्या निवासी रिअल्टी मार्केटच्या प्रदीर्घ काळ चाललेल्या जनगणनेवर आधारित अभ्यासाचा परिणाम आहे. तसेच तो गेरा डेव्हलपमेंट्सने केलेल्या प्राथमिक आणि मालकीच्या संशोधनावर आधारित आहे. शहराच्या मध्यभागी ३० किमी त्रिज्येमधील सर्व विद्यमान प्रकल्पांचा त्यात समावेश आहे.

हेही वाचा: पुणे शहर व जिल्ह्यात मंगळवारी ६ हजार ११० नवे कोरोना रुग्ण

अहवालातील महत्त्वाचे मुद्दे...

  • २०२१ च्या दुसऱ्या सहामाहीत नवीन प्रकल्प ६१ टक्क्यांनी वाढले

  • उपलब्ध घरांची संख्या घटली

  • गेल्या दशकात जून २०१७ मध्ये सर्वाधिक प्रकल्पांची नोंद

  • ९० वरून १२० युनिट्स प्रतिप्रकल्पाची सरासरी संख्या वाढली

  • नवीन लक्झरी सेगमेंट प्रकल्पात १५८ टक्के वाढ

  • ग्राहकांची मोठ्या प्रकल्पांना पसंती

  • घरांच्या किमती पाच टक्क्यांनी वाढल्या

  • ग्राहकांची परवडणारी क्षमता सुधारली

विक्री आणि नवीन पुरवठा वाढण्याबरोबरच किमतींमध्ये गेल्या वर्षापासून पाच टक्क्यांनी वाढ होत राहिली आहे. उच्च आकार केवळ मोठ्या घरांची वाढलेली मागणीच नव्हे तर परवडण्याच्या योग्यतेतही वाढ दर्शविते. ग्राहकांची परवडणारी क्षमता सतत वाढत आहे. जी आता वार्षिक पगाराच्या ३.५६ पट आहे. बांधकाम साहित्याच्या प्रचंड वाढीव किमतीच्या दबावासह विक्रीच्या किमतीत जास्त पुरवठा होण्याचा हा धोका कायम राहील. विकासकांसाठी ते आव्हान असणार आहे.

- रोहित गेरा, व्यवस्थापकीय संचालक, गेरा डेव्हलपमेंट्स

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewssaleBuy Home
loading image
go to top