
कोथरूड - कोथरूडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजपर्यंत १९७ रुग्णांना संसर्ग झाला असून एकूण रुग्णसंख्येपैकी वस्ती भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे प्रशासनासमोर आव्हान ठाकले आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोथरूडमध्ये पहिला रुग्ण २३ मार्च रोजी सापडला. त्यानंतर २५ एप्रिल रोजी कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला. तीन मे ला तिसरा, ४ मे रोजी चौथा आणि नंतर हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. ३० मे रोजी ही संख्या ३१ वर पोचली. कोरोनाचा शिरकाव वस्ती भागात होऊ नये म्हणून प्रशासन पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करत होते. विविध संस्था संघटनांनी केलेले मदतकार्य आणि शिस्तबद्ध लॉकडाउन यामुळे कोथरूड ग्रीनझोनमध्ये राखण्यास मदत झाली. परंतु मद्यविक्री सुरू झाल्यानंतर कोरोनाने डोके वर काढल्याचे बोलले जात आहे.
दोन आठवड्यांत ही संख्या शंभरावर गेली. व दाट लोकवस्ती असलेल्या केळेवाडी, वसंतनगर, शास्त्रीनगरमधील श्रीकृष्ण कॉलनी, पीएमसी कॉलनी या भागात संख्या झपाट्याने वाढली. १२ जूनला शंभर असणारी संख्या बुधवार (ता. १७) रोजी १९७ वर पोचली.
सध्या कोथरूड भागात १३२ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ६० जण कोरोनामुक्त झाले आहेत आणि ५ जणांचा मृत्यू झाला आहे. आता या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी प्रशासनाला कठोर उपाय योजना करावी लागणार आहे.
१५५ रुग्ण वस्तीभागातले
केळेवाडी परिसरात आज नव्याने २१ रुग्ण आढळले असून मंगळवारपर्यंत (ता. १६) एआरएआय रस्ता, विश्वशांती मंडळ, बालशक्ती मंडळ, वसंतनगर, मोरे श्रमिक वसाहत, मेगासिटी या भागात ६७ रुग्ण सापडले होते. तर शास्त्रीनगरमधील पीएमसी कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, पत्राचाळ, मराठा महासंघ सोसायटी, लोकमान्य वसाहत या भागात आजपर्यंत एकूण ६७ जणांना संसर्ग झाला आहे.
वस्ती पातळीवर तपासणी सुरू आहे. स्वच्छतागृहांची, परिसराची वारंवार स्वच्छता करणे आदी उपाययोजना सुरू आहेत. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विशेष लक्ष देत आहोत.
- संदीप कदम, सहायक आयुक्त, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.