अबब! पुण्यातील रुग्णसंख्येचा आकडा ओलांडणार 50 हजारांचा आकडा

 online property cards will be available in 60 villages in the state
online property cards will be available in 60 villages in the state
Updated on

पुणे : कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज एक ते दीड हजारांची भर पडत असल्याने पुण्यातील एकूण रुग्णसंख्या आज पन्नास हजारांचा आकडा पार करेल. सक्रिय रुग्णांची संख्या आता एकोणीस हजारांवर पोहोचल्याने पुण्यात आता रुग्णांना स्वतंत्र बेड मिळणे अवघड झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज रात्रीचा आकडा हाती येईपर्यंत पुण्यातील रुग्णसंख्या पन्नास हजारांच्या वर पोहोचली असेल, जी राज्यात सर्वाधिक असेल. पुण्यात आत्तापर्यंत कोरोना झालेल्या रुग्णांपैकी 29 हजार 489 रुग्ण बरे झाले आहेत. तरीही 18 हजार 546 रुग्ण सक्रिय असून, ते विविध रुग्णालयांमध्ये तसेच काहीजण घरी उपचार घेत आहेत. या वाढत्या रुग्ण संख्येचा ताण आरोग्य सुविधांवर पडला असून,  आता सरकारी रुग्णालयांमध्ये बेड मिळणे अवघड झाले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल,  सणस मैदान सारसबाग आणि श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल यापैकी काही मैदानांची निवड करून तेथे जम्बो कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ही रुग्णालय उभे राहण्यासाठी आणखी 15 ते 20 दिवसांचा कालावधी जाणार आहे. तोपर्यंत रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी महापालिकेची धावाधाव सुरू झाली आहे. खाजगी रुग्णालयांकडूनही अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. 

पुण्याच्या महापौरांनी राज्य सरकारकडे केल्या 'या' मागण्या; वाचा सविस्तर

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी 15 ऑगस्टपर्यंत शहरात एक लाखांपर्यंत रुग्णसंख्या जाईल आणि त्यात 48 हजारांवर सक्रिय रुग्ण असतील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे एवढ्या सक्रिय रुग्णांना उपचार देण्यासाठी मोठी यंत्रणा उभी करण्याचे आव्हान प्रशासना समोर आहे. 

पुण्यातील सद्यस्थिती ( २८ जुलै सकाळपर्यंत) 

- एकूण रुग्ण संख्या :  49 हजार 217

-   बरे झालेले रुग्ण : 29 हजार 489

- एकूण मृत्यू : 1187

- व्हेंटिलेटर वरील रुग्ण : :97

- आयसीयूमधील गंभीर रुग्ण : 647

- होम आयसोलेशन : 7836

- पॉझिटिव्ह रुग्ण दुप्पट होण्याचा रेट : 21 दिवस

- एकूण चाचण्या : 2 लाख 48 हजार 515

- त्यापैकी लागण झालेले:  19.60 %

- सक्रिय रुग्ण: 37.68%

- बरे झालेले : 59.92%

- मृत्यू दर : 2.40%

- गंभीर रुग्ण : 4.01%
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com