
पुणे : गेल्या आठ महिन्यांपासून पगार झालेला नाही. परिणामी घरभाडे थकल्याने घरमालक सामान बाहेर फेकून देत आहे. मुलांच्या शाळेचे शुल्क भरायचे आहे. नातेवाइकांकडून उसने आणि खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन कर्जबाजारी झालो आहोत. पगार मागितल्यास प्रशासन म्हणते, ‘काम सोडून जा,’ त्यामुळे धड काम करू शकत नाही अन् थकलेला तीन ते पाच लाखांचा पगारही सोडून जाऊ शकत नाही,’’ अशी व्यथा नऱ्हेतील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचारी, परिचारिका व इतर अशैक्षणिक कामे करणाऱ्यांनी व्यक्त केली.