Pune News: महापालिकेत समाविष्ट झालेल्या शाळांमध्ये अजूनही पोषण आहाराची व्यवस्था नाही. जिल्हा परिषद पुरवत असलेला हा आहार आता थांबू नये, अशी पालकांची मागणी आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मुलांना मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे.
उंड्री : नव्याने समाविष्ट झालेल्या शाळांत महापालिकेकडून पोषण आहाराचे नियोजन रखडलेले आहे. या शाळांना अजूनही जिल्हा परिषदच पोषण आहार पुरवत आहे. या शाळांसाठी महापालिकेने तातडीने पोषण आहाराचे नियोजन आखावे, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडून होत आहे.