पोषण आहार ही लोकचळवळ व्हावी- सभापती भोसले

विजय मोरे
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

उंडवडी - "राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण माह हा उपक्रम माता व गरोदर महिलांसाठी कौतुकास्पद आहे. गरोदर स्तनदा माता व किशोरी मुली बालके यांच्यासाठी पोषण आहार ही लोकचळवळ होणे गरजेची आहे. " असे मत बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी सोनवडी सुपे येथे व्यक्त केले.

उंडवडी - "राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण माह हा उपक्रम माता व गरोदर महिलांसाठी कौतुकास्पद आहे. गरोदर स्तनदा माता व किशोरी मुली बालके यांच्यासाठी पोषण आहार ही लोकचळवळ होणे गरजेची आहे. " असे मत बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी सोनवडी सुपे येथे व्यक्त केले.

सोनवडी सुपे ( ता. बारामती) येथील जिल्हा परिषद शाळेत बारामती पंचायत समिती अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प विभाग लोणीभापकर बीट दोनच्या वतीने राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत जनजागृती अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लोक चळवळीची मशाल बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले व उपसभापती शारदा खराडे यांच्या हस्ते प्रज्वलीत करण्यात आली. 

यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री.भोसले बोलत होते. याप्रसंगी उपसभापती शारदा खराडे, सरपंच मंदा मोरे, बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुन कुमार नागमवाड, विस्तार अधिकारी पुनम मराठे, पर्यवेक्षिका मिनाक्षी पाटील, मुख्याध्यापक शरद मचाले, माजी सरपंच सविता मोरे, सुहास काळे यांच्यासह विद्यार्थी, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. 

या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मशाल फेरी पेटवून गावातून प्राथमिक शाळा ते ग्रामपंचायत अशी  किशोरी, शालेय विद्यार्थिनी, महिला, बिट दोन मधील अंगणवाडी सेविका व विद्यार्थ्यांच्या वतीने  "सही पोषण देश रोषण" या घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम ढोल ताश्यावर ठेका धरुत गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या मशाल फेरीत विद्यार्थी, सेविका, पदाधिकारी व अधिकारी यांनी अभियानातील घोष वाक्य लिहलेल्या टोप्या डोक्यात  घातल्या होत्या. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेवून घोषणाबाजी केली. व पोषण आहाराबाबत सर्वांनी शपथ घेतली. 

यावेळी पर्यवेक्षिका मिनाक्षी पाटील यांनी पोषण आहार विषयी आरोग्याबाबत महिला व विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका शितल थोरात, राजश्री थोरात, रेश्मा सय्यद, मदतनीस प्रियंका जगताप, जयश्री थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nutrition should be a lokchalwal - Chairman Bhosale