न्यासाच घेणार आरोग्य विभागाची फेर परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

health department recruitment

न्यासाच घेणार आरोग्य विभागाची फेर परीक्षा

पुणे ः वादग्रस्त न्यासा कम्युनिकेशन्सकडूनच आरोग्य विभागातील गट ‘क’ संवर्गातील फेर परीक्षा घेण्यात येणार आहे. रविवारी (ता.२८) नाशिक, पुणे, लातूर आणि अकोला या ठिकाणी या परीक्षा पार पडणार असून, संबंधित उमेदवारांना न्यासाकडूनच प्रवेशपत्र वितरित करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

ऑक्टोबर महिन्यात २४ तारखेला गट क संवर्गातील परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, त्यातील काही कार्यालया अंतर्गत होणाऱ्या लेखी परीक्षेत वेगळ्या पदाची प्रश्नपत्रिका आलेल्या उमेदवारांची फेर परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ११ संवर्गांची निवड करण्यात आली आहे. फेर परीक्षेची काठिण्य पातळी सारखीच राहावी म्हणून ४० प्रश्नांची फेर परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच, वेगळ्या सत्रातील प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांसाठी सारखे प्रश्न नसल्यामुळे १०० प्रश्नांची फेर परीक्षा घेण्यात येईल, असे विभागाने म्हटले आहे.

फेर परीक्षेचा तपशील ः

सांख्यकी अन्वेषक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, स्टाफ परिचारिका, दंत यांत्रिकी, वीजतंत्री, कुशल कारागीर, अवैद्यकीय सहायक, दूरध्वनी चालक, लघु टंकलेखक, कनिष्ठ सहाय्यक

हेही वाचा: Vidhan Parishad Election : 415 मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द

परीक्षेचे स्वरूप ः

कनिष्ठ सहायक वगळता सर्वच संवर्गासाठी ४० प्रश्न, ८० गुण आणि ५० मिनिटांचा वेळ असणार आहे.

हे प्रश्न अनुत्तरीत..

  • न्यासाकडून आधी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कोणत्या उपाययोजना केल्या?

  • अपुरे मनुष्यबळ आणि अकार्यक्षम कंपनी असतानाही न्यासाकडूनच परीक्षा का?

  • दुसऱ्या पदाची प्रश्नपत्रिका आली म्हणून ही फेरपरीक्षा होतेय. परंतु जेथे गैर प्रकारांचे आरोप झाले. अशा ठाणे, नाशिक आणि अमरावतीतील परीक्षांसदर्भात कोणता निर्णय घेण्यात आला?

  • परीक्षा पारदर्शक पद्धतीने होईल, यासाठी न्यासाकडून हमी घेण्यात आली आहे का?

  • न्यायालयाने स्थगिती दिलेल्या पदांच्या भरतीचे काय होणार?

loading image
go to top