
मकर संक्रांतीसाठी तिळगुळाबरोबरच पतंग उडविण्याचा आनंद घेतला जातो. पक्षी-प्राण्यांसह माणसांच्या जिवास धोकादायक व बंदी असलेल्या मांजाची ग्राहकांकडून मागणी होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
माणसांसह पक्षी आणि प्राण्यांनाही धोका
पुणे - मकर संक्रांतीसाठी तिळगुळाबरोबरच पतंग उडविण्याचा आनंद घेतला जातो. पक्षी-प्राण्यांसह माणसांच्या जिवास धोकादायक व बंदी असलेल्या मांजाची ग्राहकांकडून मागणी होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
विक्रेत्यांकडून बंदी असलेल्या मांजाची खुलेआम विक्री जात आहे. त्यावर अजूनही ना पोलिसांचा वचक आहे, नाही महापालिका प्रशासनाचा. त्यामुळे यंदा मांजा कुणाच्या आयुष्याचा ‘दोर’ कापणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पतंग उडविण्यासाठी साध्या धाग्याला परवानगी आहे, मात्र बंदी असलेल्या चीनी मांजासह अन्य घातक मांजाचा वापर केला जात असल्याचे दरवर्षीचे निरीक्षण आहे. यावर्षीही त्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. मांजामुळे पक्षी, प्राणी व माणसांनाही आपल्या प्राणास मुकावे लागल्याने ‘पेटा’ या संस्थेने राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत मांजा विक्री व वापरावर बंदी घातलेली आहे. जानेवारी महिना सुरू झाला, बाजारपेठेत पतंगांबरोबरच घातक मांजाचीही विक्री केली जाऊ लागली आहे. परंतु अजूनही महापालिका व पोलिस प्रशासनाचे त्याकडे लक्ष नसल्याचे चित्र आहे. मध्यवर्ती बाजारपेठेमध्ये मांजाची मोठी रिळ ८०० ते एक हजार रुपयांपर्यंत मिळते. त्याचबरोबर मोठ्या रिळमधूनच ग्राहकांकडून मागणी असेल, त्याप्रमाणे १०० ते २०० रुपयांचा मांजा छोट्या रिळमध्ये भरून दिला जातो. दुकानांबाहेरील स्टॉलवर या मांजाची विक्री होते. याबरोबरच उपनगरे व वस्त्यांमधील छोट्या-मोठ्या दुकानांमध्येही नायलॉन मांजा मिळत आहे. विशेषतः लहान मुलांना या मांजाची विक्री केली जात आहे.
"सीरम'ला लसीची पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार
काय आहे सद्यःस्थिती?
पोलिसांनी केवळ मांजा विक्रेत्यांवर वरवर कारवाई करून उपयोग नाही. मांजाचे उत्पादन होणाऱ्या ठिकाणी छापे टाकावे. मांजामुळे माझी बहीण सुवर्णाच्या जाण्याने आमचे झालेले नुकसान कधीही भरून येणार नाही. मात्र, सगळ्यांच्या प्रयत्नातून नागरिकांसह पक्षी, प्राण्यांचे जीव वाचले तरी मोठे काम होईल.
- अपर्णा आशिष बापट, सुवर्णा मुजुमदार यांची बहीण
"एमपीएससी'च्या परीक्षा मार्च, एप्रिलमध्ये
मांजामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमधील दोन तरुणींना आपले जीव गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मांजा विक्री, साठा करण्यास व वापरास बंदी आहे; तरीही मांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- अशोक मोराळे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)
मांजापासूनचे धोके
घडलेल्या दुर्घटना
Edited By - Prashant Patil