
राज्य सरकारने शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया व नोकरभरती मार्गी लावण्यासाठी "एसईबीसी' प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्लूएस) किंवा खुल्या प्रवर्गातून लाभ देण्याचा निर्णय घेतला.
पुणे - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. अखेर आयोगाने या परीक्षांच्या तारखा काल (सोमवारी) जाहीर केल्या. मार्च आणि एप्रिल महिन्यात तीन परीक्षा होणार आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 14 मार्च रोजी होईल, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्च रोजी आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट "ब'ची परीक्षा 11 एप्रिल रोजी होणार असल्याचे आयोगाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
सदाशिव पेठेत खळबळ; बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह
मराठा आरक्षणावर स्थगिती येण्यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट "ब'ची परीक्षा 22 नोव्हेंबर रोजी होणार होती. परंतु त्या आरक्षणाच्या तिढ्यामुळे पुढे ढकलल्या होत्या. पुढच्या परीक्षा कधी होणार याबाबत विचारणा सुरू होती. दरम्यान, राज्य सरकारने शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया व नोकरभरती मार्गी लावण्यासाठी "एसईबीसी' प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्लूएस) किंवा खुल्या प्रवर्गातून लाभ देण्याचा निर्णय घेतला. पर्याय निवडीसाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मराठा संघटनांनी आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही, तो पर्यंत परीक्षा घेऊन नये अशी मागणी केली होती. अखेर परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या.
धक्कादायक! पुण्यात प्रसूतीवेळी बाळासह आईचा मृत्यू; शिकाऊ डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
"एमपीएससी'ने तिन्ही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही यासाठी पाठपुरावा करत होतो. आता आयोगाने या नव्या वेळापत्रकात कोणताही बदल न करता परीक्षा घ्याव्यात.
- महेश घरबुडे, विद्यार्थी