
पुणे - खराडी येथील हॉटेल स्टेबर्डमध्ये झालेल्या अमली पदार्थ पार्टीतील आरोपी डॉ. प्रांजल खेवलकर याच्या मोबाईलमध्ये लपवलेल्या फाईलमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ मिळून आले आहेत. त्यात डॉ. खेवलकर यांनी वेगवेगळ्या महिलांसोबत पार्टीमध्ये व पार्टीनंतर केलेल्या गैरकृत्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटोंचा समावेश आहे.