Pune News : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय फेऱ्यांसाठी निरीक्षकाची नियुक्ती होणार; त्रुटी आढळल्यास संस्थेवर कारवाई

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय प्रवेश फेऱ्यांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
CET Cell

CET Cell

sakal

Updated on

पुणे - तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय प्रवेश फेऱ्यांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याअंतर्गत राज्यातील काही निवडक खासगी महाविद्यालयांवर निरीक्षकांची नियुक्ती होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. या प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्यास संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सीईटी कक्षाने दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com