esakal | जीएसटी भरण्यात येणार अडचणी
sakal

बोलून बातमी शोधा

Obstacles to accounting as the taxpayer's in paying GST dues to office is closed

कर सल्लागारांना व्यापाऱ्यांचे, वस्तू व सेवाकर अंतर्गत ११ ते २२ एप्रिल २०२१ पर्यंत, विविध वस्तू व सेवाकर विवरणपत्रांचे संकलन पूर्ण करण्याची जबाबदारी असते. त्यासाठी व्यापाऱ्यांकडून १० एप्रिल २०२१ पर्यंत संपूर्ण बिलांची माहिती घेणे आवश्यक असते.

जीएसटी भरण्यात येणार अडचणी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पुणे  : एप्रिलमध्ये करभरणा होत असतो. मात्र, करदात्यांचे कार्यालय सुरू नसेल तर ते हिशोब कर सल्लागारांकडे पोचणार कसे? कर भरणा वेळेत सरकारी तिजोरीत जाणार कसा? असा प्रश्‍न टॅक्स बार संघटनेने उपस्थित केला आहे. विवरणपत्र भरण्यास उशीर झाल्यास व्याज आणि दंड भरावा लागतो. त्यामुळे व्यापारी व कर सल्लागारांना जीएसटी भरण्यात येणारी अडचणी वाढणार आहे, असे संघटनेकडून कळविण्यात आले.

कर सल्लागारांना व्यापाऱ्यांचे, वस्तू व सेवाकर अंतर्गत ११ ते २२ एप्रिल २०२१ पर्यंत, विविध वस्तू व सेवाकर विवरणपत्रांचे संकलन पूर्ण करण्याची जबाबदारी असते. त्यासाठी व्यापाऱ्यांकडून १० एप्रिल २०२१ पर्यंत संपूर्ण बिलांची माहिती घेणे आवश्यक असते. संचारबंदीमुळे ही माहिती द्यायला आणि वस्तू व सेवाकर विवरणपत्र भरण्यास विलंब झाला तर दंड आणि कर रक्कमेवर व्याज, व्यापाऱ्याला भरावी लागू शकते. त्याला कुठलीही माफी नाही आणि मासिक-त्रैमासिक विवरणपत्र भरण्याची तारीख पण वाढवणे अवघड आहे. कोरोनामुळे प्रत्येक महिन्याच्या वस्तू आणि सेवाकर गोळा करण्याच्या लक्ष्यावर देखील परिणाम होऊ शकतो, असे संघटनेचे अध्यक्ष अॅड. महेश भागवत यांनी सांगितले.

कुणी ऑक्सिजन देता का ऑक्सिजन? राज्यातील खासगी रुग्णालयात तुटवडा​

''कोरोनाची दुसरी लाट मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पसरली. त्याचवेळेस सरकारी पातळीवर उपाययोजना सुरू होणे आवश्यक होते. पण आर्थिक वर्षाअखेरीस अर्थकारणास खीळ बसू नये, या हेतूने एक एप्रिलनंतर उपाययोजना सुरू करण्यात आल्या. संचारबंदीमुळे पुन्हा आर्थिक उलाढालीचे चक्र रोखले.''
- अॅड. महेश भागवत, अध्यक्ष, टॅक्स बार संघटना

कोरोनाची त्सुनामी! २४ तासांत १.८५ लाख नवीन रुग्ण तर एक हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू​

''कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. येथील व्यापाऱ्यांना एप्रिल २०२१ मध्ये वस्तू व सेवाकर अंतर्गत मासिक-त्रैमासिक विवरणपत्र, कर भरणे व इतर वस्तू व सेवाकराचे संकलन पूर्ण करण्यास अडचण येऊ शकते.''
-अ!ॅड. सुकृत देव, व्यवस्थापन समिती सदस्य, टॅक्स बार संघटना