esakal | पुणे विद्यापीठातील संशोधनात अडथळे अकार्यक्षम उपकरणांचा फटका; मनुष्यबळाचा अभाव । Pune University
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai Phule Pune University

पुणे विद्यापीठातील संशोधनात अडथळे

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे : बंद पडलेली उपकरणे, कार्यशाळेत कर्मचाऱ्यांचा अभाव आणि वेळोवेळी नादुरूस्त होणाऱ्या उपकरणांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यायाने संशोधनाला उशीर होत असून, याच थेट फटका विद्यार्थ्यांबरोबर राष्ट्रीय महत्त्व असलेल्या संशोधनालाही बसत आहे.

हेही वाचा: सोलापूर-माकणी रोडवर भीषण अपघात; महिला जागीच ठार

पदार्थ्यांच्या विश्लेषणासाठी किंवा संशोधनासाठी आवश्यक अद्ययावत उपकरण केंद्र (सीआयएफ) विद्यापीठात उभारण्यात आले आहे. त्यातील तीन उपकरणे नव्याने बसवण्यात येत असून, दोन संयंत्रे नादुरूस्त आहे. तसेच, स्थलांतरित होऊन पुन्हा मूळ जागेत आलेली मध्यवर्ती कार्यशाळा अजूनही पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली नाही. संशोधक विद्यार्थी राजेंद्र घायवट (नाव बदलले) म्हणतो, ‘‘लॉकडाउनमध्ये प्रयोगशाळाच बंद असल्याने माझ्या पीएच.डी.ला उशीर होत आहे. त्यात विद्यापीठातील कार्यशाळा आणि मूलभूत कॅरक्टराझेशन उपकरणे अनेकवेळा बंद करतात. काही वेळा बाहेरच्या मॅकॅनिककडून किंवा संशोधन संस्थेतून स्वतःचे पैसे खर्च करून ही कामे करावी लागतात.’’

अशी आहे स्थिती

 • संयंत्रांची देखभाल, दुरुस्तीसाठी निधीचा अभाव

 • काही उपकरणांचा भाग परदेशातून आणावे लागतात

 • वित्त विभागात कागदपत्रांसाठी लाल फितीचा कारभार

 • प्रशासनाचे दुर्लक्ष

 • मध्यवर्ती कार्यशाळेत कर्मचाऱ्यांची कमतरता

काय होतो परिणाम?

 • संशोधक विद्यार्थ्याला शुल्लक तांत्रिक कामासाठी बाहेर जावे लागते

 • नमुन्यांच्या बेसिक कॅरेक्टरायझेशनला उशीर

 • महत्त्वपूर्ण संशोधन आणि प्रकल्पांना उशीर

 • नवे प्रकल्प घेताना प्राध्यापकांना पुनर्विचार करण्याची वेळ

 • संशोधक विद्यार्थी, प्राध्यापकांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागतो

मध्यवर्ती कार्यशाळेतील उपकरणे

चार प्रकारचे लेथ मशिन, मिलींग मशिन, बेल्ट कटर, मेटल कटर, वेल्डिंग मशिन, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रील मशिन, गॅस ब्लोवींग मशिन, गॅस कटर आदी.

अद्ययावत उपकरण केंद्रातील स्थिती

बंद

 • फिजीकल प्रॉपर्टी मेजरमेंट सिस्टीम (पीपीएमएस)

 • प्लाझ्मा मास स्पेक्ट्रोमीटर

 • थर्मोफोरायसीस

 • एक्सआरडी

चालू

 • कॉन्फोकल मायक्रोस्कोप

 • एफईएसईएम

 • स्पेक्ट्रोपॉलीमीटर

 • गॅस क्रोमेटोग्राफी

 • एनएमआर

"एक्सआरडी मशिन्सच भाग जर्मनीमध्ये दुरुस्तीसाठी पाठवला असून, इतर उपकरणांचे प्रमाणिकरण (स्टॅंडर्डायझेशन) चालू आहे. कॅरेक्टरायझेशनसाठी आलेले नमुन्यांवर जलद गतीने कार्यवाही करण्यासाठी केंद्र प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."- प्रा. अविनाश कुंभार, संचालक, सीआयएफ

"लॉकडाउनमुळे बंद अवस्थेत गेलेली सर्व उपकरणे पुन्हा सुरू होत आहे. देखभालीसाठी लागणाऱ्या निधीच्या कमतरतेमुळे उशीर झाला. मध्यवर्ती कार्यशाळेत अद्ययावत उपकरणे आणि मनुष्यबळाची कमतरता असून, त्यावर तातडीच्या उपाययोजना करत आहे."- प्रा. संदेश जाडकर, विभागप्रमुख, भौतिकशास्त्र विभाग

loading image
go to top