पोलीसांच्या कामात अडथळा; अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nanded crime

पोलीसांच्या कामात अडथळा; अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एकास अटक

जुन्नर : पर्यटनास बंदी असल्याच्या आदेशाची नाणेघाट ता.जुन्नर येथे अंमलबजावणी करत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्या मोरवाडी-पिंपरी येथील अकरा जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. (obstructing government work Case Again 11 people one arrested)

पोलीस कर्मचारी गणेश बाळू जोरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवार ता.३१ रोजी जुन्नरचे पोलीस कर्मचारी नाणेघाटात दंडात्मक कारवाई करत असताना स्नेहा राजन तोडणकर बोराडे व तिच्या सोबतचे इतर चार जण तसेच निलेश मारुती गायकवाड रा. मोरवाडी-पिंपरी, पुणे व त्याचा मेहुणा (नाव माहीत नाही), सुमंत विष्णू भांडारकर ,अक्षय किशोर पांचाळ, दिनेश शांताराम काशीद, प्रसाद वामन कार्लेकर, जगन्नाथ संग्राम स्वामी यांनी पर्यटन स्थळे सुरू झाली आहेत. हे पोलीस लोकांकडून पैसे घेण्यासाठी आले आहेत, असे म्हणून मोठा जमाव जमविला.

यावेळी पोलीस कर्मचाऱ्यावर चालून येऊन सरकारी कामात अडथळा आणला असल्याचे नमूद केल्याने गुन्हा दाखल आहे. रविवारी नाणेघाट व अन्य पर्यटन स्थळी विनामास्क फिरणाऱ्या ४९ जणांकडून २४ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Pune Crime News