बारावीत शिकणाऱ्या नॅशनल हॉर्स रायडरची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

बारावीत शिकणाऱ्या नॅशनल हॉर्स रायडरची आत्महत्या

किरकटवाडी : दहावीला (SSC) तब्बल 95 टक्के गुण मिळवून यशस्वी झालेल्या व सध्या बारावी (HSC) इयत्तेत शिकत असलेल्या नॅशनल हॉर्स रायडर (national horse rider) श्रीया गुणेश पुरंदरे (वय-17, रा. डी-103, मधुवंती, नांदेड सिटी, नांदेड, ता. हवेली) हिने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. (twelve standard national horse rider commits suicide)

आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास गॅलरीत व्यायाम करणारे अभिजीत देशमुख यांना काहीतरी जोरात खाली पडल्याचा आवाज आला. त्यांनी खाली पाहिले असता त्यांच्या मुलीच्या वर्गात शिकणारी श्रीया पडली असल्याचे दिसून आले. अभिजीत देशमुख यांनी तातडीने ही माहिती हवेली पोलीस ठाण्याला दिली.

माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे.

श्रीया होती नॅशनल हॉर्स रायडर......

मिळालेल्या माहितीनुसार श्रीया ही अत्यंत गुणी मुलगी होती. तसेच तिच्या घरातील वातावरणही खेळीमेळीचे होते. श्रीयाच्या वडीलांची हॉर्स राडींगची ॲकॅडमी आहे. त्यामध्ये बालपणीपासून श्रीया हॉर्स रायडींगचे धडे घेत होती. राज्य व राष्ट्रीय पातळीवर श्रीयाने हॉर्स रायडींगमध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत. सर्व काही ठीक असताना श्रीयाने इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Pune Newspunecrime