esakal | 9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिन | pune
sakal

बोलून बातमी शोधा

पोस्टकार्ड

Pune : 9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रिय..सप्रेम नमस्कार. विनंती विशेष , पत्रास कारण की.. अशा आशयाने सुरुवात असे तर शेवटी काळजी घ्या, लोभ असावा तुमची लाडकी.. अवघ्या 15 पैश्याच्या पोस्ट कार्डवर शाईने लिहिलेलां मजकुरात आदराचे, प्रेमाचे आपुलकी असे घट्ट नाते विणले गेले होते. आधुनिक काळात व्हाट्सअप ,फेसबुक मेल द्वारे जग जवळ आले असले तरी आज ही नागरिकांनाचा इंडिया पोस्टवर ठाम विश्वास असल्याने अनेक व्यवहार सुरळीतपणे सुरू आहे .

हेही वाचा: उद्या जाहीर सभेत गौप्यस्फोट करण्याचा नारायण राणेंचा इशारा

9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणुन साजरा केला जातो.

पूर्वी पोस्टकार्ड,आंतरदेशीय पत्र,तार, घेऊन येणार्‍या पोस्टमन काकाची आतुरतेने लोक वाट पाहायचे. पत्राद्वारे आपल्या प्रियजनाची खुशाली कळत होती. काळ बदला आधुनिक तंत्रज्ञान द्वारे घर बसल्या देशात परदेशात राहणार्‍या नातेवाईकांना मोबाईल च्या माध्यमातून व्हिडिओ कॉल करून विचारपूस करू लागले तसेच पैशाचे व्यवहार नेट बॅंकिंग द्वारे पूर्ण केले जाऊ लागले आहे. किती ही जग जवळ आले असले तरी पोस्ट ऑफिस वर ज्येष्ठ नागरिक सह युवा पिढीचा दृढ विश्वास आहे. कुरियर सेवा, पेन्शन सेवा, जमा ठेवी विविध बचत गुंतवणूक सरकारी योजना पोस्ट ऑफिस द्वारे सुरू आहे. खासगी बँक बंद पडू शकतात, ग्राहकांची फसवणूक होत असते असे अनेक प्रकार घडत असतात पूर्वी पासुन मला पोस्ट ऑफिस वर ठाम विश्वास आहे सरकारी असल्याने येथे पैश्याच्या व्यवहारा बाबत फसवणूक होत नाही असे ज्येष्ठ नागरिक रामचंद्र देशमुख यांनी सांगितले.

loading image
go to top