Vidha Sabha 2019 : शरद पवार, सोनिया गांधी, राज ठाकरेंविषयी सोशल मिडीयावर बदनामीकारक मजकूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

पुणे : विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सोनिया गांधी, राज ठाकरे यांच्यावर फेसबुक, व्हॉटस्‌अप, युट्युब यांसारख्या सोशल मिडीयावर बदनामीकार मजकूर व छायाचित्रे करण्याचा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

पुणे : विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सोनिया गांधी, राज ठाकरे यांच्यावर फेसबुक, व्हॉटस्‌अप, युट्युब यांसारख्या सोशल मिडीयावर बदनामीकार मजकूर व छायाचित्रे करण्याचा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

विधानसभा निवडणूकीच्या प्रचार अखेरच्या टप्प्यावर पोचला असतानाच, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे सायबर सेल चांगलेच सक्रिय झाल्याची सद्यस्थिती आहे. प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष, त्यांच्या नेत्यांविषयीचे जुने व्हिडीओ, फोटो, जुनी भाषणे काढून ते व्हायरल करण्यापर्यंतचे प्रकार सुरू होते. परंतु, विरोधक राजकीय पक्षाच्या नेत्यांविषयी समाजात गगैरसमज निर्माण करणारा मेसेज, छायाचित्रांच्या मॉर्फींगद्वारे नेत्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रकार काही महिन्यांपासून सुरु आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर व काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. या प्रकारानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य करण्यात आले आहे. 

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंगवी यांनी शुक्रवारी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. फेसबुकवर "राजकारण महाराष्ट्राचे' या पेजवर जोडले जाण्याबाबत शिंगवी यांना रिक्वेस्ट आली होती. त्यांनी ही रिक्वेस्ट "धनाजी वाकडे' या बनावट नावाने एक अनोळखी व्यक्ती चालवित असल्याचे व त्यामध्ये पवार, सोनिया गांधी, राज ठाकरे यांसारख्क्षा नेत्यांबाबत बदनामीकारक मजकूर, छायाचित्रांमध्ये बदल करून, अपलोड करण्यात आली आहेत. या पोस्टमुळे आपल्या भावना दुखावल्याने त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: offensive content about sharad pawar sonia gandhi and raj thackeray police complaint