कोरोनाच्या संकटातही सुरू आहे चमकोगिरी

daund
daund

दौंड (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने दौंड शहरात शरद भोजन योजनांतर्गत धान्य वितरण कार्यक्रमावेळी अधिकारी व पदाधिकार्यांना शारीरिक अंतराचा विसर पडला. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी जाहीररित्या स्वागत आणि सत्काराचा स्वीकार केला.

दौंड शहरात आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत गहू व तांदळाचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या सभापती सारिका पानसरे, पंचायत समितीचे उपसभापती नितीन दोरगे, जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके, राष्ट्रवादी महिला कांग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

ज्या भागांमध्ये धान्य वितरण होते तेथे फलक, फलकावर निवडक पदाधिकार्यांचे छायाचित्र, स्वागत कमानी, छोटेखानी स्टेज उभारून त्यासमोर लाभार्थ्यांसाठी गोल आणि चौकोन आखण्यात आले होते. शहरात ज्या भागात कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत किंवा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशा सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांना लागूनच धान्य वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, नागरिकांची गर्दी झाली होती. शहरातील पाटील चौक, गॅरेला हायस्कूल, इदगाह मैदान, भीमनगर, आदी भागांमध्ये पदाधिकार्यांच्या हस्ते धान्य वितरित करण्यात आले. धान्य वितरित करताना शारीरिक अंतर पाळले गेले नाही. 

दौंड शहर व तालुक्यात २९ एप्रिल ते ९ जून या कालावधीत एकूण ५९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. शहरातील तीन महिलांसह एकूण पाच जणांचा बळी गेला आहे. शहरात प्रादुर्भाव वाढत असताना आयुष प्रसाद यांच्यासह जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी संयोजकांकडून पुष्पगुच्छ आणि शालरूपी सत्काराचा स्वीकार केला.

बारामतीत पार्टीसाठी हरणाची शिकार
            
दौंड शहरात शरद भोजन योजना लाभार्थी कुटुंबांची संख्या १३०० आहे, अशी माहिती दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी दिली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने केलेल्या एक कोटी रूपयांच्या सहकार्यामुळे व पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या नियोजनामुळे शरद भोजन योजनेचा जिल्ह्यातील २ लाख लोकांना लाभ झाला आहे, अशी माहिती आयुष प्रसाद यांनी या वेळी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com