Roof Collapse
Roof Collapsesakal

Pune News : छत कोसळून पुण्यात वृध्द मृत्युमुखी

पुणे कॅम्प येथील दस्तुर मेहेर रस्त्यावरी ८३० जुन्या इमारतीचे छत पावसामुळे कोसळल्याने एक वृध्द नागरिकांचा मृत्यू झाला.
Published on

कँटोन्मेंट - कॅम्प येथील दस्तुर मेहेर रस्त्यावरी ८३० जुन्या इमारतीचे छत पावसामुळे कोसळल्याने एक वृध्द नागरिकांचा मृत्यू झाला.

कॅम्प भागातील ऐतिहासिक ब्रिटिश कालीन वारसा लाभलेल्या दस्तुर मेहेर रस्त्यावर घर क्रं ८३० मध्ये स्टॅन्ली डिसुझा (वय ५७) व जेरी डिसुझा(वय ४६ )ही भावंडं आपल्या परिवारासह राहत होती.

आज सकाळपासून कॅम्प भागात तुरळक पाऊस पडत होता. सायंकाळी ६.१५ च्या दरम्यान डिसुझा बंधू हे घरात हॉलमध्ये खुर्चीवर विशिष्ट अंतराने बसले होते. त्यावेळी घरातील स्त्रिया ह्या आतील रूम मध्ये होत्या.

अचानक सायंकाळी ७.२० दरम्यान घरातील पहिल्या मजल्याच( टेरेस) छत कोसळून ते तळमजल्याच्या छतावर पडले आणि तळमजल्याचे छत खाली बसलेल्या स्टॅन्ली डिसुझा यांच्या अंगावर सिमेंट व मातीचा ढिगारा पडल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली व ससून रुग्णालयात जाण्याअगोदर ते मृत्युमुखी पडले.

Roof Collapse
Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर ओसरला

ढिगाऱ्याचा काही भाग बाजूला बसलेल्या जेरी डिसुझा यांच्या अंगावर पडल्याने ते जखमी झाले. पुणे कॅन्टोन्मेंटच्या अग्निशमन दलाला सदरची माहिती ७.३० मिळाल्यानंतर लगेचच अपघातस्थळी आम्ही पोहोचून घरात फसललेल्या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती अग्निशमन दल अधीक्षक रोहित रणपिसे यांनी दिली.

दुर्घटनेची माहिती मिळताच बोर्डाचे अभियंता सुखदेव पाटील घटनास्थळी पोहोचले व त्यांनी प्रशासनाला कार्यवाही करण्यासाठी मार्गदर्शन केले. दरम्यान महावितरण च्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याठिकाणी विद्युतपुरवठा बंद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com