अवसरी-पेठ घाटातील जुना पुणे-नाशिक रस्ता बंद

डी. के.वळसे पाटील
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मंचर  : खेड ते सिन्नर चौपदरीकरण रस्त्याच्या कामाचे मोठे दगड व मुरूमाचा ढीग अवसरी-पेठ (ता.आंबेगाव) घाटातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर पडला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. गुराख्यांची व स्थानिक नागरिकांची गैरसोय झाली असून अवसरी-पेठ घाट वनउद्यानात येण्यासाठी पुणे, मुंबई भागातून येणारे पर्यटक व वन्य प्रेमींना दीड किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. 
 
पूर्वीचा पुणे-नाशिक रस्ता वनखात्याच्या मालकीच्या जागेतून वनउद्यानाच्या शेजारून जात होता. जुना रस्ता अजूनही सुस्थितीत आहे. पण या रस्त्याच्या पूर्व बाजूला १०० फुट उंचीवरून खेड ते सिन्नर चौपदरीकरण रस्त्याचे काम झाले आहे. सदर काम सुरु असताना दगड व मुरम जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर कोसळले आहेत. चौपदरीकरण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जुन्या रस्त्यावरील दगड व मुरम हलविण्याचे आश्वासन संबधित ठेकेदाराने दिले होते. पण त्याप्रमाणे कार्यवाही न केल्यामुळे पेठ, तांबडेमळा, भोरवाडी, अवसरी खुर्द येथील गुराख्यांची गैरसोय झाली आहे. त्यांना जुन्या पुणे-नाशिक रस्त्याचा वापर करता येत नाही.गुरांची ने-आण जीव धोक्यात घालून चौपदरीकरण रस्त्यावरून करावी लागते. भरधाव वाहने ये-जा करत असल्याने गुरे व गुराख्यांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागते. या समस्येने या भागातील गुराखी त्रस्त झाले आहेत. पर्यटक व वन्यप्रेमीनाही गैरसोयीला सामोरे जावे लागते. 

''अवसरी-पेठ घाटातून जाणारा जुना पुणे-नाशिक रस्ता वाहतुकीसाठी खुला नसल्याने वनउद्यानातील रोपवाटिकेत काम करणाऱ्या मजुरांना पायी दीड किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. वन अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली आहे. दगड व मुरूम अन्य ठिकाणी हलवून रस्ता खुला करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे दोन वेळा पत्रव्यवहार केला आहे. पण अजून कार्यवाही झाली नाही.''
- प्रज्योत पालवे, वनक्षेत्रपाल 
   
Web Title: the old Pune-Nashik road closed in Avasi-Peth Ghat