esakal | वृद्ध महिलेने चक्क चोरट्यांच्या हातीच दिले सोने 
sakal

बोलून बातमी शोधा

Theft

पुणे : हार विक्रेत्या महिलेसमवेत गप्पा मारणाऱ्या वृद्ध महिलेला स्वस्तात सोने देण्याचा बहाणा करुन चोरट्याने तिच्याकडील 50 हजार रुपयांचे सोने घेऊन पोबारा केला. हा प्रकार मंगळवारी सकाळी सात वाजता बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर घडला. 

वृद्ध महिलेने चक्क चोरट्यांच्या हातीच दिले सोने 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : हार विक्रेत्या महिलेसमवेत गप्पा मारणाऱ्या वृद्ध महिलेला स्वस्तात सोने देण्याचा बहाणा करुन चोरट्याने तिच्याकडील 50 हजार रुपयांचे सोने घेऊन पोबारा केला. हा प्रकार मंगळवारी सकाळी सात वाजता बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर घडला. 

याप्रकरणी मार्केटयार्ड येथे राहणाऱ्या 65 वर्षीय महिलेने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मंगळवारी सकाळी सात वाजता बिबवेवाडी- कोंढवा रस्त्यावरुन जात होत्या. त्यावेळी कुमार पार्क सोसायटीजवळील त्यांच्या ओळखीच्या हार विक्रेत्या महिलेसमवेत त्या गप्पा मारत थांबल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या एका तरुणाने फिर्यादी महिलेशी संवाद साधला. 

महिलेला विश्‍वासात घेतल्यानंतर स्वस्तात सोने विक्री करत असल्याचे सांगितले. त्यासाठी काही अंतरावर सराफी व्यावसायिक आला असून तुमच्याकडील सोने काढून द्या, या दागिन्यांच्या बदल्यात तुम्हाला आणखीन सोने मिळेल, असे आमिष दाखविले. 

त्यानुसार, महिलेने तिच्या गळ्यातील सोन्याची माळ, कर्णफुले काढून चोरट्याच्या हातात दिली. चोरट्याने सोन्याचे दागिने रुमालात बांधण्याचा बहाणा करुन तेथून निघून गेला. बराच वेळ सोने घेऊन गेलेली व्यक्ती आली नाही, त्यामुळे चोरट्याने आपल्याला गंडा घातल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.  

loading image
go to top