
तक्रारदार शनिवारी त्यांच्या घरी एकट्याच होत्या. घराबाहेरुन आल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे आलेल्या व्यक्तीने त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले. फिर्यादी पाणी आणण्यासाठी गेल्या, त्यावेळी तो त्यांच्या पाठीमागे आला. चोरट्याने घरात कोणी नसल्याचे पाहून फिर्यादीच्या हातातील सोन्याच्या चार बांगड्या काढू लागला.
पुणे : तहानलेल्या पाणी देणे पुण्याचे काम म्हटले जाते परंतु, तहानलेल्या पाणी द्यायची सुध्दा पुण्यात सोय नाही. ण्यातील एका आजीला तहालेल्याला पाणी देणे चांगलेच महागात पडले आहे. भरदिवसा शहराच्या मध्यवर्ती भागात पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून चोरट्याने वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरुन नेले. या घटनेत चोरट्याबरोबर झटापट झाल्याने वृद्ध महिला जखमी झाली. ही घटना शनिवारी दुपारी बारा वाजता नारायण पेठेत घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
याप्रकरणी 80 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शनिवारी त्यांच्या घरी एकट्याच होत्या. घराबाहेरुन आल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे आलेल्या व्यक्तीने त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले. फिर्यादी पाणी आणण्यासाठी गेल्या, त्यावेळी तो त्यांच्या पाठीमागे आला. चोरट्याने घरात कोणी नसल्याचे पाहून फिर्यादीच्या हातातील सोन्याच्या चार बांगड्या काढू लागला. महिलेने प्रतिकार केल्यानंतर त्याने फिर्यादीच्या हातातील बांगड्या फोडल्या. त्यामुळे फिर्यादी या जखमी झाले. महिला बांगड्या व सोन्याचे दागिने काढून देत नसल्यामुळे त्याने जबरदस्तीने दागिने काढून घेतले. त्यानंतर तो पसार झाला.
पुणे : डीएसकेंची आणखी एक आलिशान कार पोलिसांनी केली जप्त!
दरम्यान, महिलेने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीला धावून आले. तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. त्यानंतर घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला.