हडपसर - येथील ओंकार जाधव याने आफ्रिका खंडातील सर्वात उंच मानल्या गेलेले टांझानिया येथील माउंट किलीमांजारो हे शिखर नुकतेच यशस्वीरित्या सर करीत आपले वडील रामचंद्र जाधव यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. या मोहीमेत त्यांनी अवयवदानाबाबतही प्रबोधन केले. मोहीम फत्ते होताच त्यांनी राष्ट्राभिमान जागवत शिखरावर तिरंगा फडकविला.