पुणे : ओंकार ठरला देशातील युवा इथिकल हॅकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

- स्वत:च्या कंपनीसह नेदरलॅंड्‌स सरकारबरोबर करार 

पुणे : संगणकाच्या पडद्यावर तासन्‌तास सोशल मिडीयावर सर्फिंग करणारे विद्यार्थी हे नित्याचे चित्र झाले आहे. पण, त्यामधूनच इथिकल हॅकिंगद्वारे एक हजार डॉलरचे बक्षीस मिळवण्याचा सन्मान ओंकार सोनवणे या विद्यार्थ्याने प्राप्त केला आहे. देशातील सर्वात युवा इथिकल हॅकर या किताबाने नुकतेच 17 वर्षाच्या ओंकारला सन्मानित करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ओएमजी आणि नेशन रिकॉर्डमध्ये देखील त्याने अशाप्रकारे आपले नाव नोंदविले आहे. आजपर्यंत त्याने दिडशेपेक्षा जास्त कॉम्प्युटर वेबसाईटमधल्या त्रुटी संबंधितांना शोधून दिल्या आहति. त्याच्या या कामाबद्दल गुगलनेच त्याचा सन्मान केला आहे. सायबर सिक्‍युरिटी क्षेत्रात त्याने कंपनी देखील स्थापन केली असून त्याद्वारे सेवा आणि शिक्षण तो पुरवत आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेरचा असलेला ओंकार सध्या पुण्यात शिक्षण घेत आहे. सध्या नेदरलॅंड सरकारसोबत त्याचा करार झाला असून त्यांच्या संकेतस्थळातील त्रुटी तो शोधून देणार आहे. 

शालेय जीवनापासूनच मला संगणकाबद्दल कुतूहल होते. ऑनलाईन संकेतस्थळांमध्ये बऱ्याचदा त्रुटी असतात. त्याचा तोटा ग्राहकांसह संबंधित संस्थेलाही होतो. मी अधिकृतपणे त्या संस्थेशी संपर्क करुन गुगल कंपनीच्या साहाय्याने करार करून त्या संकेतस्थळातील त्रुटी शोधतो. 

- ओंकार बाजीराव सोनवणे, युवा इथिकल हॅकर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Omkar Sonawane Becomes ethical hacker