ओंकार शुगर ग्रूपचे ५० लाख क्रशिंग पूर्ण, १२७० कोटींची ऊस बिले अदा, शेतकऱ्यांच्या हितासाठी ओंकार ग्रुपची बांधिलकी
AKK26B05862
अक्कलकोट ः ओंकार शुगर ग्रुपतर्फे ५० लाख मे.टन ऊस गाळप यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील, कार्यकारी संचालक विठ्ठल गायकवाड व अधिकारी वर्ग.
ओंकार शुगर ग्रुपचे ५० लाख मे. टनाचे गाळप पूर्ण
चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांची माहिती; १२७० कोटींची ऊस बिले अदा
अक्कलकोट, ता. १२ ः ओंकार शुगर ग्रुपने चालू गळीत हंगामात शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ओंकार ग्रुपच्या सर्व साखर कारखान्यांमार्फत एकूण ५० लाख मे. टन ऊस गाळप यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. आतापर्यंतची १२७० कोटींची बिले अदा करण्यात आल्याची माहिती ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली.
गाळपासाठी शेतकऱ्यांनी पुरवठा केलेल्या ऊसापोटी ओंकार शुगर ग्रुपने एकूण १२७० कोटी रुपयांचे ऊसबिल सर्व युनिट्समार्फत वेळेत अदा केले आहे. सर्वोच्च ऊसदर, काट्यावर योग्य वजन आणि वेळेवर ऊसबिल ही ओंकार शुगर ग्रुपची ओळख आहे.
बाबूराव बोत्रे-पाटील म्हणाले, शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे. कुठेही वजन करा आणि ऊस घेऊन या काटा बरोबरच राहील, शेतकऱ्याला सर्वोच्च ऊस दर दिला जाईल आणि ऊस बिल वेळेत मिळेल ही त्यांची ठाम भूमिका होती. आज गळीत हंगामात ओंकार शुगर ग्रुपने ही भूमिका केवळ शब्दांत नव्हे तर कृतीतून करून दाखवली असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात पाच कारखाने
ओंकार शुगर ग्रुपचे राज्यात एकूण १७ साखर कारखाने असून सोलापूर जिल्ह्यात ५ कारखाने आहेत. या कारखान्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गाळप करण्यात येत असून, शेतकऱ्यांचा त्यांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

