
जुन्नर : लेण्याद्री गणपती देवस्थानवतीने श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथे अंगारक संकष्टी चतुर्थी व श्रावण मासनिमित्त‘श्री शिव गणेश कृपा महायाग’ चे आयोजन करण्यात आले होते. महायागात ८० यजमानांनी सहभाग घेतला. दिवसभरात अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक ‘श्री गिरीजात्मज’ गणपतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. ‘श्री गिरीजात्मज’च्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली होती.