esakal | Pune : दसऱ्याच्या दिवशी पथ संचलन नाही, केवळ शस्त्रपूजन होणार
sakal

बोलून बातमी शोधा

rss

Pune : दसऱ्याच्या दिवशी पथ संचलन नाही, केवळ शस्त्रपूजन होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी दसऱ्याच्या दिवशी शहरात पथ संचलन न करण्याचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतला आहे. त्याऐवजी परंपरेचे पालन करण्यासाठी शहरातील विविध ५५ नगरांमध्ये शस्त्रपूजन करण्यात येणार आहे.

दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस पथसंचलन आणि शस्त्रपूजन करून साजरा केला जातो. परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. तसेच, नवरात्री महोत्सवात सरकारकडून कोरोनाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्यामुळे यावर्षी दसऱ्याच्या दिवशी शुक्रवारी (ता. १५) पथसंचलन करण्यात येणार नाही. मात्र, शहरातील विविध ५५ नगरांमध्ये कोरोनाच्या नियमाचे पालन करीत छोट्या प्रमाणात शस्त्रपूजन कार्यक्रम होतील, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यांनी दिली.

loading image
go to top