कोरोनामुक्त झालाय? मग, निर्धास्त राहू नका कारण...

Once you are free of coronavirus don't be careless
Once you are free of coronavirus don't be careless

पुणे : कोरोनामुक्त झाला म्हणजे पूर्ण धोका टळला असं नाही. बरे झालेल्यांनो तुम्ही निर्धास्त व्हावे अशी स्थिती नाही. विशेषतः मधुमेही, उच्च रक्तदाब, हृदयविकाराच्या रुग्णांसाठी तर असे निश्चित म्हणता येणार नाही. स्वतःच्या शरीरातील बदलांवर लक्ष ठेवा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

पुण्यात 9 मार्चला पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. या सहा महिन्यांमध्ये कोरोना विषाणूंचा महाभयंकर उद्रेक आपण अनुभवला. सुरवातीपासून कोरोनाचा संसर्ग झालेला प्रत्येक रुग्ण लवकर बरा कसा होईल, यावर आरोग्य यंत्रणांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यापुढे जाऊन आता कोरोनातून बरा झाला म्हणजे जीवाचा धोका टळला, असे काही रुग्णांबद्दल म्हणता येणार नाही, हे सहा महिन्यांच्या निरीक्षणातून समोर आले आहे. 

काय होतं नेमकं?
कोरोनामुक्त झाल्यानंतरही सुमारे एक महिनाभर हृदयविकार होण्याचा धोका रहातो. त्यातून हृदयाची क्रिया अचानक बंद पडून रुग्णाचा मृत्यू होण्याची काही अंश शक्यता असते. तसेच, काही रुग्णांमध्ये अर्धांगवायूचा झटका आलेल्याचे दिसले आहे. तसेच, खूप दिवस फुफ्फुसांचे आजार सुरू राहिल्यांचेही निदान झाले आहे. 

कोरोनाचा असाही दुष्परिणाम...
   कोरोनाच्या संसर्गामुळे हृदयाला इजा झालेली असते
-    हृदयाला झालेली ही इजा भरून येण्यासाठी वेळ लागतो.
-    विषणूंच्या संसर्गामुळे हृदयाला आतून सूज येण्याची शक्यता असते.
-    त्यामुळे रक्तवाहिन्या सूजतात. 
-    रक्ताच्या गाठी तयार होतात. त्यातून हृदयविकाराचा झटका येतो. 


कोणाला सर्वाधिक धोका?
कोरोना संसर्ग जितका जास्त तितका हा ‘पोस्ट कोवोड सिंड्रोम’चा परिणाम जास्त रहातो. कोरोनाच्या सौम्य संसर्गाला पंधरा दिवस असेल तीव्र संसर्गाच्या रुग्णामध्ये तो प्रभाव महिन्याभरापेक्षा जास्त दिवस रहातो. त्यातही मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंड विकार, श्वसनाचे विकार असणाऱया रुग्णांना याचा धोका सर्वाधिक असतो. 

डॉक्टरांचे निरीक्षण...
कोरोना संसर्गामुळे रुग्णाचे रक्त घट्ट होण्याची प्रक्रिया होते, असे निरीक्षण आहे. सार्स आणि इतर विषाणूंच्या संसर्गाचेही असाच अभ्यास आहे. संसर्गामुळे रुग्णाला न्यूमोनिया होतो. तो बरा झाल्यानंतर एक महिना हृदयविकाराचा धोका असतो. कोरोनामध्ये या बाबतचे संशोधन सुरू आहे.

पोस्ट कोविड ओपीडी
कोरोनाच्या उद्रेकाच्या सुरवातीला सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र बाह्य रुग्ण विभाग (फ्ल्यू ओपीडी) सुरू करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने दिला होता. त्यानंतर आता ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुर करावी, अशी सूचना समितीने दिली आहे.

Video : 'दार उघड उद्धवा, दार उघड', भर पावसात भाजपने घातला गोंधळ

“कोरोनामुक्त झाल्यानंतर एकदम निष्काळजी होऊ नका. स्वतःच्या शरीरातील बदलांवर बारकाईने लक्ष द्या. छातीत दुखत असेल, दम लागत असेल किंवा तो वाढत असेल तर त्याला गांभीर्याने घ्या. तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या,”
-    डॉ. ऋतूपर्ण शिंदे, हृदयविकार तज्ज्ञ

“कोरोना संसर्गामुळे फुफ्फुसांना कायम स्वरुपी इजा होण्याची शक्यता असते. तसेच, त्याची पूर्णक्षमतेने कार्य करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे कोरोनामुळे न्यूमोनिया झालेल्या रुग्णांनी याची विशेष काळजी घ्यायला हवी,,”
-    डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com