esakal | दीड वर्षाच्या ‘अश्वथ’ची ‘इंडिया बुक रेकॉर्ड’मध्ये नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

दीड वर्षाच्या ‘अश्वथ’ची ‘इंडिया बुक रेकॉर्ड’मध्ये नोंद

दीड वर्षाच्या ‘अश्वथ’ची ‘इंडिया बुक रेकॉर्ड’मध्ये नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: धनकवडीतील अजिंक्य बनसोड व त्यांची पत्नी विशाखा यांचा मुलगा अश्वथची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. अवघ्या दीड वर्षाचा असलेल्या अश्वथने इंग्रजीची ए टू झेड मुळाक्षरे ओळखणे आणि ती सांगणे, इंग्रजी कवितांच्या रिक्त जागा भरणे, १-२० मधील अंक सांगणे, प्राणी, शरीराचे १४ भाग, १-२० मधील संख्या, १२ फळे, १० रंग, १५ दैनंदिन वापराच्या वस्तू, ९ खाद्यपदार्थ, ८ आकार, इंग्रजी वर्णमाला ओळखणे आणि संबंधित शब्दांचे वाचन, एक ते दहा इंग्रजी अंक संगणकाच्या की-बोर्डवर न चुकता टाइप करणे, यासाठी त्याची नोंद झाली आहे.

हेही वाचा: पुणे: गटशिक्षणाधिकाऱ्यासह दोघांना ५० हजारांची लाच घेताना अटक

१ वर्ष दोन महिन्यांचा असताना तो सुरुवातीला गाणी ऐकू लागला आणि १५ दिवसांत त्याला इंग्रजीची मुळाक्षरे येऊ लागली. त्याच्या आईने वेगवेगळ्या गोष्टी शिकविल्या. ‘हे काय आहे हे सांग,’ अस विचारत तो शिकत गेला. हे कौशल्य पाहून अश्वथची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

अश्वथचे वडील अजिंक्य म्हणाले, ‘जन्मापासूनच त्याची बौद्धिक व शारीरिक वाढ इतर मुलांपेक्षा जलदगतीने होत गेली. जसे बसणे, चालणे, बोलणे, उभे राहणे, ओळखणे या क्रिया तो लवकर शिकला. तो प्रत्येक गोष्ट निरीक्षण करून त्याप्रमाणे अनुकरण करत होता. जन्मल्यापासूनच त्याला प्रत्येक क्रिया करताना आम्ही सतत कविता किंवा इंग्रजी मुळाक्षरे म्हणून दाखवत होतो.

loading image
go to top