बिटकॉइन फसवणूक प्रकरणी आणखी एकास दिल्लीत अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पुणे : बिटकॉइनमध्ये गुंतवणुक करुन जादा परतावा देण्याचे आमिष दाखवित हजारो लोकांना गंडा घालण्याच्या प्रकरणात सायबर पोलिसांनी आणखी एका आरोपीला दिल्ली येथून अटक केली. न्यायालयाने आरोपीला 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बिटकॉइन फसवणुक प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

सुरेंदरसिंग अलग (रा. विकासपूरी, दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अलग हा गेन बिटकॉइन एलएमएम मार्केटिंग विभागामध्ये कार्यरत होता. त्यानेच गेन बिटकॉइनमध्ये गुंतवणुक केल्यास जादा आर्थिक फायदा होईल, अशा पद्धतीने फिर्यादीला आमिष दाखविले होते. त्यामुळे अनेक दिवसांपासून सायबर गुन्हें शाखेचे पथक अलग याचा शोध घेत होते. सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस कर्मचारी राजकुमार जाबा व शाहरुख शेख यांच्या पथकाने अलग यास दिल्ली येथून अटक केली. त्यानंतर त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

बिटकॉइनमध्ये गुंतवणुक करुन जादा परतावा देण्याचे आमिष दाखवुन फसवणुक केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर निगडी व अन्य एका ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने दिल्ली येथून मुख्य सूत्रधार अमित भारद्वाज यांच्यासह त्याचा 10 जणांना यापूर्वी अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणाचे दोषारोपपत्रही न्यायालयात सादर करण्यात आले होते. दरम्यान अलग यास पोलिसांनी अटक केली. 

Web Title: one arrested in case of Bitcoin in Delhi